महाराष्ट्र माझा
By MAHESH BHUWAD - April 30, 2019
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ।
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ।।
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।
ज्या मातीत जन्माला आलो त्या काळ्या मातीतल्या सहयाद्रीच्या पर्वतरांगांमधील, डोंगर, दऱ्या, नद्या पठार, मैदान, घाटमाथा अशा विविध प्रदेशांनी बनलेला असा अमुचा "महाराष्ट्र देशा." देशगौरवासाठी झिजला, सह्याद्रीचा सिहं गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला "महाराष्ट्र माझा "
१ मे "महाराष्ट्र दिन" तसेच "आंतरराष्ट्रीय कामगार दिन ." १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्या निर्मितीला आज जवळजवळ ५९ वर्षे पूर्ण झाली. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांचे स्मरण करण्याचा दिवस. महाराष्ट्राची निर्मिती अशी सहजासहजी झाली नाही त्यासाठी त्या शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिल आहे. मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला आपले घुडगे टेकायला भाग पाडले आणि त्यातुनच १ मे दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. मुंबईतल्या मराठी माणसाने आपले अस्तित्व टिकून ठेवलं मुबईतला मराठी माणूस जिवंत आहे आज त्याच अस्तिव आहे त्या १०६ हुतात्म्यांमुळे.
" मुबंई "जीला वेगवेगळ्या नावानं संबोधलं जात. मायावी नगरी, आर्थिक राजधानी, न थांबणारी मुबंई लोकल, जो कोणी मुंबईत आला कि तितलाच होऊन जातो. पोटापाण्याचा प्रश्न सोडविणारी, अगदी रस्त्यात पुटपाथवर आयुष्य वेचणाऱ्यापासून ते श्रीमंतापर्यँत प्रत्येकाला मुंबईने सामावून घेतले आहे. गरीब-श्रीमंत असा भेद मुंबईने केला नाही. उदरनिर्वाहासाठी घराबाहेर पडलेला प्रत्येक व्यक्ती नोकरीसाठी मुंबईत येते. तर काही मुंबई पाहण्यासाठी येते. फिर फिर फिरून अखी मुंबई पालती घालतो. मुबंई दर्शन करतो पण मुंबईच अस्तित्व कोणामुळे ? स्वतःही आणि आपल्या सोबत आलेल्या मुलानाही तो सांगू शकत नाही. हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकाच जुनं नाव फ्लोरा फाउंटन मुंबईत कामासाठी येणाऱ्या प्रत्येकांच्या तोंडी आहे. पण त्याचा इतिहास काय करायचा आहे जाणून. मुंबईने आजवर अनेकांचं पोट भरलं पोट भरणाऱ्या मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला विसरून गेलो आहोत. ऊन, वारा, पाऊस सहन करीत डोक्यावरती पक्ष्यांची विष्टा झेलीत हुतात्मा स्मारक उभं आहे. मुंबईतून मराठी माणसाचा टक्का कमी होत चालला तसा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास, चळवळीसाठी तमाम मराठी माणसानं रक्त सांडलं आहे त्यांनी दिलेलं योगदान हळूहळू अभ्यासक्रमातून फुसत चाललो आहे आणि मुबंईत येणाऱ्या माणसाच्या नजरेतून दुर्लक्षित होऊ लागलं आहे.
सयुंक्त महाराष्ट्राची मागणी भाषावार प्रांतरचनेनुसार होती. मराठी माणसाचं राज्य अस्तित्वात यायला पाहिजे. यासाठी मराठी भाषिकांनी एकत्र येऊन एकसंध महाराष्ट्राची राज्य अस्तित्वात आणलं. १ मे १९६० रोजी दोन भाषिक राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्ये निर्माण झाली. मुंबईसह तमाम मराठी भाषिकांचे स्वप्न अखेर साकार झालं. पण आज तीच मुंबई पुन्हा एकदा मराठी, भाषा, मराठी लोकांच्या अस्तित्वासाठी लढत आहे. एकसंघ मुंबईला तोडण्यापासून वाचावं याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे नाहीतर पुनश्च सयुंक्त महाराष्ट्राचा आवाज कानी घुमत राहील.
कामगार दिन
गिरणी कामगारांच्या वसाहती आणि गिरण्या अशी लालबाग, परळ, गिरगाव, प्रभादेवी अशी मुंबईची जुनी ओळख. मुंबईतल्या गिरण्या बंद पडल्या आणि गिरण्याचा इतिहास काळाच्या पडद्याआड गेला. कालांतराने जुनी ओळख हि फुसट होत गेली. संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासात गिरणी कामगारांचं योगदान मोठं आहे. मराठी माणूस आणि गिरणी कामगार अशी मुंबईतल्या माणसाची ओळख. गिरण्यामधून तयार होणाऱ्या कापडाने मुंबईची मान उंचावली. पण १९८२ साली झालेल्या कामगारांच्या संपाने मुंबईच्या कापड गिरण्यावर संक्रात ओढावली परिणामी कापड उदयोग बंद पडले त्या जागी आज टोलेजंग टॉवर, इमारती, कॉर्पोरेट ऑफिसेस, हॉटेल थाटली गेली. एकेकाळी कामगार वसाहती, चाळी सर्वसामान्यांची घरे रेसिडेंसीनल भाग आता परळ, लोअर परेळ, प्रभादेवी, महालक्ष्मी एरिया कमर्शियल कॉर्पोरेट सेक्टर म्हणून नावारूपास उदयाला आला. आणि मुंबईतला मराठी माणूस बाहेर फेकला गेला. मोठ मोठे बिल्डर्सनी आपल्या स्वार्थासाठी मुंबईकरांच्या चाळी घरे घशात घातली. ज्या मुंबईला घडवण्यात सिंहाचा वाटा होता तेथील लोक देशोधडीला लागली. आपल्या मालकी हक्कांच्या घरासाठी गिरणी कामगाराला रस्त्यावर यावं लागलं. आजच्या तारखेला गिरणी कामगाराना त्यांची घर मिळण्यासाठी तारीख पे तारीख करत हिंडावं लागतंय. त्यातील काही पिढीतील लोक आपल्याला घर मिळाली तर काही लोक मिळतील या आशेने वाट पाहत आहे. गिरणी कामगाराची मुंबई ग्लोबल इकॉनामिक कॅपिटल कधी झाली कळलंच नाही. मुंबईतल्या गिरणी कामगारांचं भविष्य अंधारातच राहिलं.
मुंबई आणि नवी मुंबईतल्या औदयोगिक भागातल्या कामगाराना आपल्या कामच योग्य मोबदला दिला जात नाही. कामाचे तासापेक्षा अधिक वेळ राबवून घेतलं जात. लहान मुलांच्या गरजेचा फायदा घेत तुटपंज्या पगारात काम करून घेतलं जात. कामगारांचे प्रश्न, त्याचं आरोग्यमान याकडे मालक वर्ग दुलर्क्षित करत आला आहे. मालक आणि कामगार यांच्यातला संघर्ष कायमच चालत आला आहे. बड्या मोठ्या कंपन्या मधून कंत्राटी पद्धतीने ठेऊन राबवले जात आहे. त्यामुळे रोजगार, करिअरच्या वाटाना ब्रेक लागला. वाढती महागाई, बेकारीमुळे आर्थिक अडचणी, कर्जाचे डोंगर, घराचे भाडे, हफ्ते यांमुळे अधिक भर पडून जुळवाजुळवी करताना नाकी नवं येऊ लागले आहे. कमी पगारात घर चालत नसल्याने अनेकांची घरे कोलमडली आहेत. सर्वसामान्यांना घर चालवणं कठीण होऊन बसलं आहे. मालक नेहमीच कामगारांचं शोषणच करत आला आहे. कामावर अल्प मजुरीत १२ ते १४ तास राबवून घेतलं जातंय. प्रत्येक कामगाराने ८ तासच काम केल पाहिजे. अतिरिक्त कामाचा (लेट सीटींग) मोबदला देखील दिला जात नाही हे शोषण होऊ नये याकरिता कामगार वर्गाने (ऑफिस मध्ये चांगल्या पदावर काम करणारा देखील कामगारच) एकत्र येऊन आपलं शोषण थांबवून आपल्या अस्तित्वाची लढाई चालू ठेवेळी पाहिजे असा या दिवशी प्रत्येक कामगार वर्गाने निर्धार केला पाहिजे.
- महेश भुवड
- महेश भुवड
0 comments