मी गार्गी बोलतेय....

By MAHESH BHUWAD - March 27, 2019

मी गार्गी बोलतेय, Gargi


मुंबईतील नामांकित कॉलेजपैकी एक मोठं कॉलेज आणि कॅम्पस सुद्धा. आम्ही कला शाखेच्या तिसऱ्या वर्षाला होतो. एक नवं जग कसलंच बंधन ना टेंशन, नवीन मित्र मैत्रिणी बोले तो फुल टू धमाल. कॉलेज सुरु होऊन जेमतेम एक महिना झालं असेल. सिल्याबल्स देखील सुरु झाला होता. एक नवीन एडमिशन झालेली मुलगी क्लासमध्ये आली माझं नवीन एडमिशन आहे. ऍज उज्वल आपल्यासारखी असावी असा आमचा समज. आमच्या ग्रुपने अनेक वेळा पाहिले तिला एकटीच असायची ती, तिला कोणी मित्र मैत्रिणी देखील नव्हत्या. शांत आणि सोज्वळ स्वभावाची असावी तिचा चेहराच सांगत होता पण त्या चेहऱ्यात विलक्षण होत तिच्या चेहऱ्यावरच सूर्याचं तेज आणि स्मित हास्य अनेकांना आकर्षित करत होतं. पहिल्या दोन लेक्चरर्स नंतर संस्कृतच लेक्चर होत. संस्कृतचा तास सुरु झाला. तिच्या पहिल्याच लेक्चरमध्ये तिने मॅडमची वाहवा मिळवली. किती अस्खलित संस्कृत बोलत होती. आम्ही डोळे विस्फारत पाहतच राहिलो. जसं फाडफाड इंग्लिश बोलावं तसं. अनेक प्रश्नांची उत्तरे सहज देत होती. लेक्चर संपलं आम्ही सर्व लंचसाठी कॅन्टीनमध्ये गेलो. पण प्रत्येकांच्या तोंडावर एकच नाव कोण आहे 'ती' ? तीच नाव काय ? काय बोलते संस्कृतमध्ये फक्त बोलतच नाही तर तिचं प्रभुत्व आहे भाषेवर. जेवण झालं आणि आम्ही बाहेर आलो. तितक्यात ती कॅम्पस मध्ये दिसली. 'प्रचू, ती बघ, ती जात आहे, ग्रुपमधून कैवल्य बोलला. ये प्रचू, बोलना तिच्याशी ? का आवडली तुला वाटतं ! 'प्रचूने मिश्कीलपणे उत्तरं दिलं, अगं तस नाही, ती एकटीच असते म्हणून विचारलं. आपल्या ग्रुपमध्ये मेंबर करूया तिला. खूप हुशार दिसतोस तू आशिष, अशा बाबतीत तू स्मार्ट बॉय आहेस. नयना तू बोला ना ? केदार बोलला ! अरे, कूल यार.. ठीक आहे, बोलते मी तिच्याशी. नयना बोलली, ओके बोलते मी तिच्याशी ! येसSS..कैवल्य मनात पुटपुटला त्याचा चेहराच बरचं काही सांगत होता. 'कैवल्य, तू जाऊन का विचारत नाही? तूच विचार तिला. नयनाने थोडसं रागात येऊन बोलली. 'मम..ss मी, होय, तूच !. कैवल्य कमोन यार, गो गो...सॉलिड यार, कैवल्यने डेअरिंग केली. कैवल्य तसा सिम्पल मुलगा पण मुलींशी बोलायला घाबरायचा.

हे हाय, माय नेम इज कैवल्य. कैवल्य ने तिला विचारलं. व्हाट्स अ गुड नेम" ? 'गार्गी'. तिने आपलं नाव सांगितलं. सच, ब्यूटीफुल नेम. कैवल्य ऐकून आनंदीत झाला. तुझं संस्कृत फार उत्तम आहे. कधीपासून शिकते आहेस. कैवल्यने विचारले. जन्मतः म्हणजे? आमचं संपूर्ण कुटूंब संस्कृतमधून बोलतो. ग्रेट यार ! ऐ, मला पण शिकवण ना. हे बघ, कैवल्य मला माहित आहे तू येथे कशासाठी आला आहेस ? तुझा हेतू मी पूर्णपणे ओळखला आहे. निमित्त आहे नाव जाणून घेण्यासाठी आणि इम्प्रेशन पाडण्यासाठी हो ना ? नाही नाही... तसं नाही जस्ट.... बट यु आर इंटेलिजेंट गर्ल. हो, मी आहेचं गार्गी आवेशात येऊन उत्तर दिलं. आता फक्त नाव ऐकलंस पुढे पण ऐक. गार्गी फक्त एक सुंदर नावच आहे? तुला गार्गी बदल माहिती आहे का? गार्गी कोण आहे? कैवल्याच्या डोळ्याच्या भुवया उंचावल्या. तुला फक्त गार्गी नावाबद्दल माहित आहे पण कोण आहे हे माहित नाही. मुलींना इम्प्रेस करायचं, त्यांच्या प्रेमात पडायचं हे माहीत आहे तुला पण गार्गी बदल माहित नाही एकदा गार्गी बद्दल जाणून घेशील तर पुढे काय होईल तुझं याचा विचार केला आहेस का? गार्गीच्या प्रश्नाच्या भडिमाराने कैवल्यला वाटले हि मुलगी सर्वसामान्य मुलीसारखी नाही. उगीचच आलो येते. 'प्रचूच ऐकलं असतं तर बरं, झालं असतं. कैवल्य मनात पुट्पुट होता. 'गार्गी' म्हणजे उदार, भाग्यवान, मैत्रीपूर्ण, आधुनिक, विदुषी. तुला गोत्र माहित आहे का? गार्गीने विचारलं. हे काय असतं गोत्र. कैवल्य ऐकूण चकित झाला. तुला साधं गोत्र माहित नाही. हो नाही माहित मला मग तुला काय माहित आहे ते सांग. फक्त कॉलेजच्या कॅम्पस मध्ये यायचं. मनाला वाटेल तसं वागायचं. लेक्चरला बसायचं कि नाही हे आपणच स्वतः ठरवायचं. आणि मुलीच्या मागे फिरत बसायचं. बरोबर आहे ना ! हो बाबा, तुझंच बरोबर आहे. सांगतेस ना !

 
                    
गार्गीने सांगायला सुरुवात केली. वशिष्ठ, अंगिरा, भृगु, कश्यप, अत्रि, जमदग्नी, अगस्त्य, गौतम विश्वामित्र, शांडिल्य, भारद्वाज, अंगिरा, पुलस्ति, पुलह, अंगिरस, भार्गव, कौशिक, कपिल, मैत्रेयी, पराशर, वाल्मिकी, वत्स आणि त्यापैकी एक "गार्ग्य" प्रत्येक व्यक्तीला आपलं गोत्र माहित असायला पाहिजे. धार्मिक विधी करताना गोत्र विचारलं जात माहिती नसेल तर कश्यप गोत्र लावलं जात. माझं गोत्र गार्ग्य. 'गार्ग्य' हे गर्ग ऋषींच्या नावावरून आलं आहे. त्याना एक मुलगी होती तिचे नाव गार्गी. गर्ग ऋषींची पुत्री "गार्गी". भारतातील पहिली विदुषी विद्वान मुलगी/ स्त्री.  

भारतात पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांबरोबर दार्शनिक शास्त्रांमध्ये स्त्रियाही तितक्याच विदुषी होत्या. म्हणजे पांडित्य होत्या त्यामध्ये विश्ववारा, अपाला, घोषा, लोपामुद्रा, शची, मैत्रयी आणि वाचक्नवी गार्गी. केवळ सुंदरच नाही तर शिक्षा, दीक्षा, शील, गुण, कर्तव्य, अधिकार आणि सामाजिक भूमिका अशा विविध गुणांनी असलेल्या स्त्रीला वेद म्हणतात ती घरातील साम्राज्ञी, देशाची राज्यकर्ती. पृथ्वीची सम्राज्ञी बनण्याचा अधिकार मिळत होता. वेदामध्ये स्त्री यज्ञीय अर्थात पूजनीय आहे. वेद, पठन, अध्ययन, अध्यापन करण्याचा अधिकार होता. जनक राजाने दरवर्षीप्रमाणे एक ब्रम्हज्ञानीची सभा आयोजित केली होती त्यामध्ये विद्वान पंडित स्त्री-पुरुष देखील सहभागी झाले होते. शास्त्रार्थ विद्येत जो विजेता होईल त्या विद्वानाला सोन्याच्या मोहरांनी अलंकृत १००० गाईचं दान दिल जाईल अशी घोषणा केली होती. जो विजयी होईल तोच या गाईना घेऊन जाईल. अशावेळी ऋषी याज्ञवल्क्य पुढे आले आणि आत्मविश्वासाने आपल्या शिष्याना सांगितले या गाई आपल्या आश्रमात घेऊन चला. हे ऐकल्यावर इतर ऋषींनी आमच्या सोबत शास्त्रार्थ विध्येत सहभागी व्हा, यामध्ये याज्ञवल्क्यांनी बाजी मारली. त्यांनतर गार्गी स्वतःहून पुढे आली हे ऋषीवर ! तुम्ही स्वतःला इतके ज्ञानी समजता कि या गाई आपल्या शिष्याना आश्रमात घेऊन जायला सांगता? याज्ञवल्क्यांनी  उत्तर दिलं या गाई पाहून मी स्वतःला रोखू शकलो नाही. परंतु जिंकल्याशिवाय तुम्ही या गाई घेऊन जाऊ शकत नाही. सर्वांची  अनुमती असेल तर मी ऋषी याज्ञवल्क्यांना काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाची योग्य उत्तरे दिली तर तुम्ही या गाई घेऊन जाऊ शकता. सर्वानी गार्गीला अनुमती दिली. गार्गीने प्रश्न विचारायला सुरुवात केली. 

गार्गी आणि याज्ञवल्क्य संवाद

हे ऋषीवर ! पाण्याविषयी असं बोललं जातं कि कोणताही पदार्थ यामध्ये मिसळला जातो तर हे पाणी कशाने भरले आहे? 

गार्गी, हे पाणी वायूने भरले आहे. मग वायू कशाने भरलेला आहे गार्गी ने प्रश्न केला.

वायू अंतरिक्षात ओतप्रोत आहे याज्ञवल्क्यांनी उत्तर दिलं.

गार्गीने पुन्हा प्रश्न विचारला, " हे अंतरिक्षलोक कशाने ओतप्रोत आहे?"

अंतरिक्षलोक गंधर्वलोकात ओतप्रोत आहे' याज्ञवल्क्यांचं उत्तर.

गंधर्वलोक कशात ओतप्रोत आहे ?" गार्गीचा पुन्हा प्रश्न.

गार्गी, आदित्यलोकात याज्ञवल्क्यांच उत्तर आलं.

आदित्यलोक कशात ओतप्रोत आहे? गार्गीचा प्रतिप्रश्न.

चंद्रलोकात बरं, गार्गी याज्ञवल्क्यांनी उत्तर दिलं.

चंद्रलोक कशात ओतप्रोत आहे? गार्गीने पुन्हा प्रश्न केला.

चंद्रलोक नक्षत्रलोकात ओतप्रोत आहे याज्ञवल्क्यांच उत्तर.

मग नक्षत्रलोक कशात सामावलेले आहे गार्गीचा प्रश्न.

गार्गी, नक्षत्रलोक देवलोकात सामावलेलं आहे.

हे देवलोक कशात ओतप्रोत आहेत? गार्गीचा प्रश्न

देवलोक इंद्रलोकात ओतप्रोत आहेत याज्ञवल्क्यांचं उत्तर.

इंद्रलोक कशात सामावलेलं आहे?

इंद्रलोक प्रजाप्रती लोकांत ओतप्रोत आहे.

हे महर्षी, प्रजाप्रती लोक कशात सामावलेले आहे?

प्रजाप्रती लोक ब्रम्हलोकात ओतप्रोत आहे, गार्गी.

मग, ब्रम्हलोक कशात ओतप्रोत आहे. गार्गीचा पुन्हा प्रश्न.

याज्ञवल्क्यांनी उत्तर देताना म्हटले, "गार्गी, फार प्रश्न विचारू नकोस. तुझे मस्तक (धडापासून वेगळे होऊन) खाली पडावे असे मला वाटत नाही. ज्या अंतिम दैवता बद्दल प्रश्न विचारू नयेत अशाबद्दलही तू प्रश्न विचारू लागलेली आहेस. गार्गी, प्रश्न विचारण्याची मर्यादा ओलांडू नकोस." यांनतर वाचक्नवी गार्गीने मौन स्वीकारलं. गार्गीने निव्व्ळ तर्काच्या जोरावर सत्याला-ब्रम्हज्ञानाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे याज्ञवल्क्यांनी तिला मौन स्वीकारावे लावले.

गार्गीने पुन्हा एकदा दोन प्रश्न विचारून याज्ञवल्क्यांना अडवायचा प्रयत्न केला. प्रश्न विचारण्याच्या पद्धतीवरून गार्गीचा स्वतः बदलचा विश्वास व उत्तर देताना परब्रह्माचें इंद्रियातील, अविनाशी व सर्वव्यापी स्वरूप स्पष्ट करण्यात याज्ञवल्क्यांचा ठामपणा प्रकर्षांने दिसून येतो. याज्ञवल्क्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान झाल्यामुळे त्यांचे वादस्पर्धेतील श्रेष्ठत्व मान्य करण्यात गार्गीने दाखवलेला मनाचा मोकळेपणाही वाचक्नवी च्या यौगिक अर्थाशी सुंसगत आहे. नंतर गार्गीने सर्वांची अनुमती घेत याज्ञवल्क्यांना पुन्हा प्रश्न विचारला. 

हे ऋषीवर, जे स्वर्गाच्या वर, पृथ्वीच्या खाली या दोन लोकांमध्ये आहे आणि ज्याला लोक भूत, वर्तमान व भविष्य या तिन्ही काळात विध्यमान समजतात ते कशात ओतप्रोत आहे?

ते आकाशात ओतप्रोत आहे. याज्ञवल्क्यांनी उत्तर दिलं. 

मग, हे आकाश कशात ओतप्रोत आहे? गार्गीने प्रश्न विचारला. 

गार्गी, यालाच लोक अक्षर म्हणतात, याज्ञवल्क्यांनी उत्तरास सुरुवात केली, हे स्थूल नाही. सूक्ष्म नाही. -ह्रस्व नाही. दीर्घही नाही (अग्नीप्रमाणे) चमकणारे नाही. (पाण्याप्रमाणे) स्नेहयुक्त नाही. सावली किंवा अंधार यांनी समन्वित नाही. हे वायुसमन्वित किंवा आकाशसमन्वित नाही. हे संगविहीन, रसविहीन व गंधहीन आहे. हे चाक्षुविरहित, श्रोत्रविरहित, वाग्विविरहित आहे. हे मनोरूप, तेजोरूप, प्राणरूपही नाही. हे मुखहीन आहे. हे कशाचाच उपभोग घेत नाही. कोणीही याचा उपभोग घेऊ शकत नाही. "याज्ञवल्क्य पुढे म्हणाले गार्गी, याच्या आज्ञेनेच सूर्यचंद्र एकमेकांपासून निराळे राहतात (दिसतात). यांच्या प्रशासनामुळेच गार्गी, स्वर्ग व पृथ्वी विभक्त दिसतात. या अक्षराच्या प्रशासनामुळेच निमेष व मुहूर्त, दिवस व रात्र, पंधरवडा आणि महिने, ऋतू व संवत्सरे निराळी झाली. गार्गी, या अक्षराच्या आज्ञेनेच पश्चिमेकडून पूर्व दिशेला काही नद्या वाहतात. तर काही पूर्वेकडून हिमालय (श्वेत) पर्वतातून पश्चिमेकडून पूर्वकडे तर काही पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा अन्य दिशात वाहतात. गार्गी, या अक्षराच्या अनुज्ञेनेच मानव दात्याची, देव यजमानांची म्हणजे यज्ञ करणाऱ्याची व पितर पितृयज्ञांची आकांशा बाळगतात. याज्ञवल्क्य पुढे म्हणाले गार्गी, हे 'अक्षर' न समजताच जर कोणी या जगात हजारो वर्षे आहुती देऊ लागला, यज्ञ करू लागला तर ते सर्व सान्त म्हणजे विनाशीच ठरते. गार्गी. हे अक्षर न समजताच जो हे जग सोडून जातो तो दरिद्रीच आणि गार्गी हे अक्षर जाणून समजून घेऊन जो हे जग सोडतो तोच खरा (तत्व) वेत्ता किंवा विद्वान' आणि गार्गी हे अक्षरतत्व म्हणजे अदृष्ट असा द्रष्टा आहे. अश्रूत असा श्रोता आहे. ज्याचे मनन करता येत नाही असा मनन करणारा आहे. अविज्ञात ज्ञाता आहे. याच्याशिवाय दुसरा द्रष्टा नाही, निराळा श्रोता नाही, निराळा मनन करणारा नाही, वेगळा विज्ञाता नाही आणि गार्गी या अक्षरतत्वातच आकाश ओतप्रोत आहे. "

गार्गी : असं म्हटलं जातं कि, स्वतःला जाणून घेण्यासाठी आत्मविद्यासाठी ब्रह्मचर्य आवश्यक आहे. पण तुम्ही ब्रम्हचारी नाही आहात तुमची तर दोन दोन पत्नी (कात्यायनी आणि मैत्रेयी) आहेत. असं नाही वाटत तुम्हांला तुम्ही योग्य उदाहरण समोर ठेवत आहात?

याज्ञवल्क्य : ब्रह्मचारी कोण आहे गार्गी ?

गार्गी : जो परिपूर्ण अंतिम सत्याच्या शोधात मग्न आहे.

याज्ञवल्क्य : तर मग असं का वाटतं गृहस्थ (संसारी) अंतिम सत्याचा शोध नाही करू शकत?

गार्गी : जो स्वतंत्र आहे तोच केवळ सत्याचा शोध लावू शकतो. विवाह (लग्न) तर बंधन (करार) आहे.

याज्ञवल्क्य : लग्न बंधन (करार) आहे?

गार्गी : हो शंकाच नाही

याज्ञवल्क्य : कसं ?

गार्गी : लग्नामध्ये पुरूषाला स्त्रियांवरती लक्ष्य ठेवावं लागतं. भटकणारं मन कोणत्या न कोणत्या चिंतेत मग्न रहावं लागत. आणि संसारात मुलं झाली कि त्याची काळजी चिंता वेगळी, अशात मन सत्य शोधण्यासाठी मुक्त कुठे आहे ? म्हणून लग्न करार आहे महर्षी.

याज्ञवल्क्य : कोणाची काळजी करणं हे बंधन आहे की प्रेम ?

गार्गी : प्रेम पण बंधन आहे महर्षी ?

याज्ञवल्क्य : प्रेम खरं असेल तर ते मुक्त करत. पण प्रेमात स्वार्थ असेल तर तो प्रबळ होतो तर तो बंधन म्हणून ओळखला जातो समस्या प्रेम नाही स्वार्थ आहे.

गार्गी : प्रेमात स्वार्थ असतो?

याज्ञवल्क्य : प्रेमाने काही आशा जोडल्या जातात. आकांक्षा, इच्छा सुद्धा जोडल्या जातात तेव्हा स्वार्थाचा जन्म होतो. असं प्रेम नक्कीच बंधन म्हणून ओळखलं जात. ज्या प्रेमात अपेक्षा नाही इच्छा सुद्धा नाही जे प्रेम केवळ फक्त देणं जाणत तेच प्रेम मुक्त करत.

गार्गी : ऐकताना तुमचे शब्द प्रभावित करतात महर्षी पण तुम्ही या प्रेमाचं उदाहरण देऊन सांगू शकता?

याज्ञवल्क्य : डोळे उघडले आणि पाहिलं कि संपूर्ण जग निःस्वार्थ प्रेमाचं प्रतीक आहे. हि प्रकृती निःस्वार्थ च सर्वात मोठं उदाहरणं आहे. सूर्याची किरणे, ऊन त्याचा प्रकाश या पृथ्वीवर वर पडतो तेव्हा जीवन चालू होतं. हि पृथ्वी सूर्याकडून काहीच मागत नाही ती तर फक्त सूर्याच्या प्रेमात खुळायचं हेच तिला माहित आहे आणि सूर्य सुद्धा आपली सत्ता, हक्क या पृथ्वीवर दाखवण्याचा प्रयत्न नाही करत. नाही पृथ्वीकडे कधी मागत. स्वतःला तेवत ठेऊन संपूर्ण जगाला जीवन देत असतो. हे आहे "निस्वार्थ प्रेम", गार्गी ! प्रकृती आणि पुरुषाची लीला आणि जीवन यांच्या खऱ्या प्रेमाचं फळ आहे. आपण सर्व त्या निःस्वार्थ प्रेमातून जन्मलो आहे आणि सत्य शोधण्यात कुठं अवघड आहे.

या अपेक्षित उत्तरांना ऐकून गार्गी पूर्णपणे समाधानी होते. आणि बोलते मी माझा पराभव स्वीकार करते. तेव्हा याज्ञवल्क्य सांगतात गार्गी तू अशा प्रकारे प्रश्न विचारण्याच संकोच ठेऊ नको कारण प्रश्न विचारले जातात तेव्हाच उत्तर समोर येते . 

हे ऐकून गार्गी म्हणाली या विद्वानांनो या व्यक्तीला केवळ प्रणाम करून चालणार नाही यांचं व्यक्तिमत्व (Personality) जबरदस्त आहे. सगळी सभा चकित झाली. ते परम ब्रह्मनिष्ठ आहे ते भारतीय तत्वज्ञानाचा पिता (Father of Indian Philosophy) आहे. बुद्धिनिष्ठ व तत्वनिष्ठ वैदिक ज्याला पहिला नमस्कार करतात असा ते अद्द्वितीय महापुरुष म्हणजे "याज्ञवल्क्य" योगीश्वरं याज्ञवल्क्यं नारायण नमस्कृत्य ।

ऋषी याज्ञवल्क्य 

यांनतर गार्गी ने त्यांची प्रशंसा करून थांबली तेव्हा सर्वानी मान्य केलं कि गार्गी मध्ये अहंकाराचा लवलेश नाही आहे. गार्गी ने याज्ञवल्क्यांना नमस्कार करून सभेतून निघाली. गार्गीचा उद्देश ऋषी याज्ञवल्क्य यांना हरवणं नव्हतं. गार्गी वेद, ऋचा पंडित विदुषी आणि ब्रह्मज्ञानी होती तिला सर्व प्रश्नांची उत्तरे माहित होती.

गार्गी या नावातच सुंदरता आहे केवळ नावात सुंदरता असून नाही चालत तर त्यात नावाप्रमाणे गुण सुद्धा ओतप्रोत असावे तेव्हा ते अर्थपूर्ण आहे. आणि त्या नावाचा अभिमान वाटेल. नाव स्पेशल नसतं जगण्यातील अर्थपूर्णता स्पेशल असतात त्या व्यक्तीतील गुण जे सर्वानाच आकर्षित करते.

गार्गीच्या तत्वज्ञानाने कैवल्य स्वतःला विसरून गेला. स्वतःमध्ये असलेल्या अद्भुत चैतन्याचा शोध घेण्यात हरवून गेला.




- महेश भुवड 






All Rights Reserved, 2018 © Mahesh Bhuwad


  • Share:

You Might Also Like

0 comments

All Rights Reserved, 2018 © by मुक्त मी . Powered by Blogger.