Refugee

By MAHESH BHUWAD - July 01, 2019



बरेच दिवस काही लिहिले नाही. वेळ नाही म्हणून... हे एक कारण झालं. आर्टिकल ना ब्लॉग. घडलेल्या घटनांविषयी आपण काय विचार करतो. ती घटना घडली का घडली ? कशी घडली ? कुठे घडली ? केंव्हा घडली ? कधी घडली ? या सर्वांचा एकूणच बातमीमध्ये विचार केला जातो. अशा रोजच्या बातम्या, घटना न्यूज पेपर मधून वाचत असतो. पत्रकारितेचा पेशा आहे म्हणून वाचावेच लागते. "बातमीतला मी" बातमीच्या पलीकडे सुद्धा एक विचार असतो आणि ते म्हणजे माझं मतं. घडलेल्या घटनांविषयी आपलं स्वतःच मत सुद्धा असू शकतं. मग का बरं केवळ बातमी वाचून बाजूला व्हायचं असा प्रश्न पडतो. अशा एका बातमीने मला स्वस्थ बसू दिलं नाही लिहायला भाग पाडलं. त्या चित्राने ह्रदय पिळवटून टाकलं. वेळात वेळ काढून ऑफिस मधून आल्यावर आज या विषयावर लिहायचंच ठरवलं. 


मागील आठवड्यातील घटना आहे. बातमी वाचताना त्या फोटोने माझं लक्ष्य विचलित केलं. बघताच क्षणी मन विछिन्न झालं. मेक्सिकोमधील रियो ग्रॅंड नदीच्या किनाऱ्यावर एका बाप-लेकीच्या मृतदेहांचा फोटो. या फोटोने आयलान कुर्दीची आठवण करून दिली. ऑस्कर मार्टिन्स आपली पत्नी आणि मुलगी व्हॅलेरिया मार्टिन्सला सोबत घेत रियो ग्रँड नदीमार्गे पोहत अमेरिकेतील टेक्सस येथे जाणार होते.  मुलगी सुरक्षित राहावी म्हणून बापाने आपल्या मुलीला पाठीवर घेऊन टी शर्टमध्ये बांधले आणि नदीत उडी मारली आणि तो टेक्ससच्या दिशने पोहू लागले पण वेगाने वाहणाऱ्या नदीने दोघा बापलेकींना आपल्यात सामावून घेतले. नदीमार्गे पोहत अमेरिकेत जायचे त्याचं हे स्वप्न अपुरं राहिलं. या बापलेकीचा मृतदेह नदीच्या किनारी सापडला. जगभर या घटनेने लोक संतापले. अनेक लोक हा फोटो पाहून भावुक झाले. ट्रम्प यांच्यावर टीका झाली. या बापलेकीच्या मृत्यूला जबाबदार कोण ? अमेरिकेची नवी व्हिसा पॉलिसी ? ट्रम्प यांचे निर्वासितांना अमेरिकेत घातलेली बंदी ? कि आपला देश भूमी सोडण्यासाठी भाग पाडणारे राजकीय धोरण ? जगभर निर्वासितांचा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला. निर्वासित या शब्दापेक्षा Refugee हा शब्द अधिक परिचयाचा आणि जवळकीचा वाटतो.

अमेरिका-मॅक्सिको सीमेवर सध्या सुरू असलेल्या वादाचा फटका सेल्व्हाडोरमधील नागरिकांना बसत आहे. अनेक नागरिक अमेरिकेकडे शरणागतीची मागणी करत आहेत. ऑस्करही काही दिवसांपासून अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्वासितांविरोधी धोरणांमुळे त्यांना यश येत नव्हते. निर्वासितांचा प्रश्न हि जागतिक समस्या बनली आहे. आपल्या मातृभूमीतून हाकलून दिल्याने मातुभूमीत होत असलेल्या छळाला कंटाळून तेथील स्थायिक नागरिकांना आपली भूमी आपला देश सोडून आश्रयाकरिता, सुरक्षितेसाठी दुसऱ्या देशात जावं लागत. तेथील परिस्थिती, अमानुष छळ, मानवी अत्याचारामुळे पोषक वातावरणासाठी नागरिक स्थलांतर करतात. अशी कोणत्या कारणांमुळे या नागरिकांना आपला देश, आपली भूमी सोडून जावं लागतं आणि त्यांना निर्वासित होण्याची वेळ पडते. निर्वासितांच्या ज्वलन्त प्रश्नाचे उत्तर शोधण्यात देश अपयशी ठरले आहेत. निर्वासितांचा आजवरचा इतिहास पाहिला कि युरोपमधून ज्यू लोकांची हिटलरने जर्मनीमधून केलेली हाकलपट्टी. ज्यूवर झालेले अत्याचार, छळामुळे, धर्मासाठी, राजकीय विचारांच्या गटामुळे, धोरणामुळे, वंश, भाषा, संस्कृती यावरून त्याच्या मूलभूत हक्कांवर गदा आली. डेन्मार्क, नॉर्वे , फिनलंड, आइसलँड या देशाचे बनलेले प्रदेशही Refugee friendly म्हणून ओळखले जातात.


२० जून हा दिवस जागतिक निर्वासित दिन पाळला जातो. निर्वासितांच्या प्रश्नांना राजकीय, सामाजिक वंश, भाषा, धर्माची, संस्कृतीची झालर आहे. गरीब-श्रीमंत हा भेद आहे तसा निर्वासितांना हि या घटकांना सामोरे जावे लागते. समाजाला लागलेली कीड आहे यामध्ये नाहक निरपराध, निष्पाप लोकांचा, लहान मुलांचा बळी जातोय. युरोपातून सुरु झालेली रस्सीखेच सीरिया, अफ़गाणिस्तान, पाकिस्तान, भारत, श्रीलंका, म्यानमार पर्यंत पोहचली. एकूणच पाहिले कि निर्वासित सुद्धा माणसेच असतात ना मग त्यांच्यावर जनावरांसारखी वागणूक का दिली जाते. फोटो पाहिल्यांनर माणुसकी संपत चालली आहे असचं वाटू लागले आहे. निर्वासितांना वाली कोण ? माणुसकी उरली आहे फक्त एका क्लिकसाठी, माणुसकी उरली आहे आपल्या कॅमेरात फोटो कैद करण्यासाठी, माणुसकी उरली आहे बघ्यांची अलोट गर्दी पाहण्यासाठी.


- महेश भुवड








  • Share:

You Might Also Like

0 comments

All Rights Reserved, 2018 © by मुक्त मी . Powered by Blogger.