Awaiting for your response ?

By MAHESH BHUWAD - July 27, 2019


तू गेलास... त्यानंतर मागे वळून बघितलेस का रे परत कधी ? काय झालं असेल तुझ्यामागे ? तुझ्यावर उत्कट प्रेम करणाऱ्या माणसाचं तुझ्याशिवाय ? तुला प्रश्न पडला असेल कि नसेल माहित नाही. जीवन कसं अगदी भकास वाटतंय. निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आता तरी मागे वळून बघ... आमच्यासाठी नाही. तू नाती जोडलीस नवीन जोडलेल्या नात्यांवर प्रेम केलंस त्याना आपलसं केलंस त्यांच्यासाठी. जिच्यावर तुझं प्रेम जडलं तिला भेटण्यासाठी... खरं सांगू प्रेम होत ना तुझं तिच्यावर फक्त प्रेम नाही, तुझा श्वास होती ती. तुझ्या नावाच्या आधी तीच नाव आधी जोडलं जात "राधेकृष्ण" गोकुळ सोडल्यावर परत बासरी वाजवल्याचा कुठेही उल्लेख नाही. 

तुला एक सांगू, "Krishna made play divine" एकमेकांना duffer बनवून wine पिण्यातच जीवन गेलंय. स्पष्ट सांगतो तुला राग येईल पण खरंय आहे तुझ्याशिवाय तुझी गीता सुद्धा बंदिस्त चौकटीत घुसमटतेय. तिच्यात ताकद नाही राहिली. खोट्या शपथा घेणाऱ्यांच्या धर्मसंकटात सापडलीय. जाताना तू भेट म्हणून देऊन गेलास कधी तिचा विचार केलास आहे कशी आहे ती ? खरचं खूप कठोर झालायस तू. अरे, आम्हाला तुझं तत्वज्ञान नको. तुझं तत्वज्ञान किती लोक आचरणात आणतात हे आम्ही पाहिलंय. ज्यामध्ये तत्व आणि ज्ञान मध्ये फरक करून तुला विसरून गेले आहेत. एकवेळ आम्ही म्हणतो वेळ कुठे आहे आज ? पण असं वाटतंय तुझ्याकडे सुद्धा वेळ नाही आमच्यासाठी. आमचं सोडून दे रे तुझ्यावर प्रेम करणारी तुला मानणारी तुझी माणसे तुला सोडून गेली आहे. आज ती एकटी पडली आहेत. सत्यासाठी, न्यायासाठी झगडत आहे तुला काहीच वाटत नाही. आमच्या भाषेत बोलायचे झाले तुला कोणाची काही पडली नाही. 

गीतेत तू यदा यदा हि धर्मस्य... म्हणतं परत येण्याचं वचन दिलंस आहेस. अरे वो एक सांगायचं राहून गेलं "अश्वत्थामा एक चिरंजीव" वाचायचं म्हणत होतो पण ते मीडियावाले अश्वत्थाम्याच्या बातमीकडे लागले आहे. बिचारा युगान युगे इकडे तिकडे भटकत आहे. काही ना दिसतो तर काही लोंकानी पाहताच दातखिळी बसते. त्याला मोक्ष कधी मिळणार ? आता आलास तर युध्दासाठी येऊ नकोस. संहार काय असतो आम्ही आता पाहिलंय. आयुष्यात सुखासाठी भटकणारे खूप आहेत. सुख नको पण जीवनात सूर भरायला ये. पैशासाठी रात्रंदिवस पळत राहणारे अनेक. पैसे नको प्रेमाचे दोन शब्द बोलण्यासाठी ये. जवळ असून सुद्धा संवाद होत नाही. तुझं तू अन माझं मी. काय सांगू तुला बोलण्यासारख खूप आहे. पण ऐकून घ्यायला कुणाकडे वेळ नाही. काहींना त्यात रस नाही. प्रत्येकाची कहाणी घर घर की.  

तुला शोधायचा प्रयत्न केला फेसबुकवर तुझ्या नावाने अनेक फेक अकाउंट वापरत आहे. आलास तर तू तुझ्या नावाच copyright करून घ्यायला विसरू नकोस. आणि हो आता तर आधार कार्ड compulsory आहे ते आधी बनवायला विसरू नकोस त्याशिवाय तुझी कोणतीही कामे होणार नाही. एक राहिलं contact number किंवा email id देऊन जा गेलास कि परत कधी येशील काही सांगता येणार नाही.  

कृष्णा येताना राधेला घेऊन ये पुन्हा तुझी बासरी ऐकायला मिळेल. जीवनाच्या बासरीत सूर भरायला ये !


- महेश भुवड 










  • Share:

You Might Also Like

0 comments

All Rights Reserved, 2018 © by मुक्त मी . Powered by Blogger.