डेली सोफ मालिकांना BREAK कधी लागणार !
By MAHESH BHUWAD - April 12, 2019
ऐ.. तू कोणती मालिका पाहते ? मी, ना ...... हि मालिका बघते. पण तू हि ....... सुद्धा मालिका पाहत जा, नवीनच सुरु झाली आहे. खूप छान आहे. कलाकार देखील चांगले आहेत. एकदम मस्त स्टोरी, कौटुंबिक पण आहे. हो... किती वाजता, कोणत्या चॅनेलवर ? ..... या चँनेलवरती. संध्याकाळी ... वाजता. मित्रांनो हि कोणत्या मालिकेची प्रमोशन ऍड नाही, हि तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनातील मनोरंजन विश्वातील गोष्टींविषयी बोलत आहे. अगदी सहज कुठेही घर, गार्डन मध्ये कधी लोकल ट्रेन, बस मध्ये प्रवास करताना गप्पा मारतेवेळी विचारलेला प्रत्येकांच्या मनातला प्रश्न टीव्ही सिरीयल म्हणजे "मालिका"
मालिका पाहण्याचा मोह कुणाला नाही होणार ? आजच्या टीव्ही जगतात मालिका न पाहणारा दुर्मिळच. सर्व कुटुंब एकत्र बसून पाहतो त्या मालिकांचा इतिहास काही सांगायला नको. कधी सुरुवात झाली ? कोणी केली ? या मालिका घरामध्ये एकत्र बसून कशा पाहता येतील ? त्याची वेळ काय निश्चित असावी ? कोणत्या वेळेत दाखवली कि प्रेक्षक वर्ग पाहतील ? मग आठवड्यातून किती वेळा दाखवायची ? किती तास दाखवायची ? कोणत्या मालिका लोकांना आवडतात. मालिकेचं कथानक काय ? कोणते कलाकार दखवायचे ? ज्यामुळे आपल्या मालिका प्रेक्षक वर्ग पाहू शकेल. हा सर्व एकंदरीत या सर्व प्रश्नांचा विचार मालिका निर्माते करतात तर मग आपण का नाही हा विचार करायचा कि कोणत्या मालिका बघायच्या ? या सर्व गोष्टी वाचताना कुठंतरी मनाच्या कोपऱ्यात किंवा डोक्यात हा विचार नक्कीच आला असेल. हा ..... हि मालिका खूप छान होती. पुन्हा एकदा चालू केली पाहिजे.
मालिका पाहणारा प्रेक्षक वर्ग नक्कीच जुन्या मालिकांना मिस करत असतो. चॅनल वाढले तसं मालिका देखील वाढल्या नवीन कलाकार देखील समोर येऊ लागले. अभिनय पाहून तसेच मालिकेतील कथानक, रहस्य एकूच मालिका पाहण्याची औत्सुक्ता प्रेक्षकांच्या मानत कशी खिळवून ठेवावी आणि अल्पावधीत मालिका हिट. प्रेक्षक वर्ग मालिकांना अक्षरशः डोक्यावर घेतात. याला फक्त काही मोजक्याच मालिका अपवाद आहेत. हल्ली कमर्शिअल मालिकेत कुठं आलं आहे निव्व्ळ मनोरंजन आणि समाज प्रबोधन? संपूर्ण कुटंब एकत्र बसून पाहता येतील अशा मालिका राहिल्या नाहीत. कॉमेडी मालिकेत हास्य विनोद विनोदाच्या पलीकडे गेला आहे. कमरेखालचे जोक्स, मोठं मोठयाने हसणारे महागुरू. एखाद्या व्यक्तीला विषयाला टार्गेट करून हास्य निर्मिती करायची. रोजच्या रोज दाखवणाऱ्या विनोदाला प्रेक्षक वर्ग कंटाळला आहे. तेव्हा मालिका तयार करणाऱ्यांनी हा विचार देखील नक्कीच केला पाहिजे काय दाखवलं पाहिजे. पण प्रेक्षक वर्ग सुद्धा हा विचार करताना दिसत नाही.
ऑफिसमधून घरी आल्यावर थोडंसं मनावरचं ओझं कमी होईल या उद्देशानं मालिका प्रेक्षक वर्ग पाहत असतो पण आता जीवनाचा एक अविभाज्य बनलेला भाग "डेली सोफ". डेली सोपच्या रहाटगाड्याला अवाच्या सव्वा एपिसोड. एपिसोडची महापर्वाकडे होणारी वाटचाल. आठवड्यातले पूर्ण आठवडे त्यात रविवार महारविवार महाएपिसोड. रविवार म्हणजे मेगा ब्लॉक आता समीकरण बदलली आहेत. काही मालिका तर इतक्या रटाळ झाल्या असून त्या बंद देखील करत नाहीत. मालिकांमधील संवाद हरवला आहे. कुत्रिमपणा, तोचतोचपणा वाढला आहे. टीआरपी वाढविण्यासाठी एपिसोड वाढविण्यासाठी मालिकेचा मूळ कथानक आणि आशयापासून भरकटत जाते. तरीही प्रेक्षक वर्ग अशा काही मालिकांना पसंतीला उतरतात. सासू सुनेचं दिवस गेले. कट, कारस्थान, अफेयर, दोन दोन लग्न दाखवून समाजात कोणता पायंडा घालत आहे मालिकावाले ? नैतिकता, समाज भान, आणि संध्याकाळचा प्राइम टाईम पाहता समाज परिवर्तन, मूल्यशिक्षण, प्रबोधन करतील अशा मालिकाच कौतुकास्पद ठरतील. वेळेत मालिका संपवून ती नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतील.
महेश भुवड
All Rights Reserved, 2018 © Mahesh Bhuwad
0 comments