By MAHESH BHUWAD - March 07, 2020

पडद्यामागील "ती"

८ मार्च "जागतिक महिला दिन" म्हणून साजरा केला जातो. आजची स्त्री चूल आणि मूल मध्ये न अडकता  कालबाह्य विचारांना मुरड घालून समाजातील चौकट मोडून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रीचा तिच्या स्त्रीत्वाचा आज गौरव आणि सन्मान करण्याचा दिवस. एक मुलगी ते महिला आजवरचा तीचा प्रवास कसा होता जाणून घेऊन उलगडून  घेण्याचा दिवस.

International Women's Day 

अगदी सहज विचारला जाणारा प्रश्न...
कसं जमतं ग तुला... ?

आदल्या रात्री झोपायला उशीर झाला
पुन्हा सकाळी लवकर उठायचं तुला
जेवणाचा डब्यापासून ते सकाळचा नास्ता
ऑफिसला जायला उशीर होतोय...
स्वतःबरोबर इतरांची काळजी सुद्धा तुलाच
स्वतःची आवड असो वा नसो पण ते बाजूला ठेऊन
काय आवडेल तुला सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत
सकाळच्या गडबडीत एवढं सारं आवरायला कसं जमतं ग तुला ?

कुटुंबाच्या आनंदात स्वतःला विसरून जायला
केवळ चार भिंती मध्ये न वावरता चूल आणि मूल यांच्या पलीकडे
पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करायला
घराला घरपण द्यायला आनंद, प्रेम आपुलकी वाटायला
कुठेही दमछाक झाली असली तरी कधी सांगायचं वाटतं नाही तुला
कुणाला ग बरं सांगणार तू तुझी कहाणी
इथे कुणालाच वेळ नाही ऐकायला
लढत असते स्वतःशी स्वतःबरोबर पण कोणीच सोबत नसतं
तू व्यस्त असताना थोडीशी मदत करू का तुला असं विचारायला
कारण तू  नेहमी वावरत असते पडद्यामागे
सगळ्यांची काळजी करत मर्जी राखत असते सोबतीला
कधी आई बनून तर कधी बायको म्हणून,
खरं सांगू , एवढं सारं कसं जमतं ग तुला...!
कारण तू एक  स्त्री आहे म्हणून...
ओळखता नाही आलं ग तुला इतकी वर्षी सोबत असताना
कारण तू कधी जाणून दिलसं नाही, कि मी समजून घेतलं नाही
कसलीस उणीव भासून दिलीस नाही तू ...

एखाद्या नाटकाच्या रंगमंचावर कुशल कलाकारांप्रमाणे स्वतःची छाप पाडत  गेलीस
पण  त्या पडद्यामागे काय घडत असतं हे फक्त तुलाच माहित असतं
कौतुकाचा वर्षांव होत होता तेव्हा एका यशस्वी पुरुषामागे खंबीरपणे उभी होती तू
पण एका यशस्वी स्त्री मागे कोण बरं मागे खंबीरपणे उभा असतो हा प्रश्न मागे सोडून जातो
कोणतीही तक्रार न करता डोळयातील पाणी लपवून आनंदाने चेहऱयावर हास्य उमटवीत
खरं सांगू तुला कसं ग जमत एवढं सारं तुला...?

ती लढत असते स्वतःच्या हक्कासाठी,  न्यायासाठी, स्वातंत्र्यासाठी  जो तिला अजूनही मिळालेला नाही
ती जननी, ती प्रियसी ती भार्या तीच माया आणि तीच छाया आयुष्यात अनेक रूप निभावणारी
विविध क्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या "ती" ला  मानाचा मुजरा  !!!

#Happy International Women's Day  

-  महेश भुवड 





  • Share:

You Might Also Like

0 comments

All Rights Reserved, 2018 © by मुक्त मी . Powered by Blogger.