संकट मोचन रामभक्त हनुमान

By MAHESH BHUWAD - April 07, 2020


            मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठ । 
            वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।।

आज पवनपुत्र, अंजनीपुत्र, रामभक्त हनुमानाचा जन्मदिवस. सात चिरंजीवी मधील एक हनुमान. प्रश्न पडतो कि भक्त मोठा कि भगवान? शिवालय म्हटले कि शंकर आणि नंदी. हनुमानाचं जीवन म्हणजे एक भक्त के बिना भगवान अधुरा. भक्तीच्या नऊ पायऱ्या आहेत. त्यातील दास्यभक्तीच उत्कृष्ट उदाहरण हनुमान. गुरुजींनी एका विद्यार्थाला विचारले तुला वीर मारुती आवडतो कि दास मारुती? लहान मुलाने पटकन उत्तर दिले दास मारुती. जो दास असतो तोच वीर असतो. 

वानर हि जात हलकी असली तरी हनुमानाने कधी जाणून दिलं नाही. वानरजात रानटी, असंस्कृत, चंचल अशी जमात आहे पण हनुमान यापलीकडे होता बल-बुद्धी संपन्न, मानसशास्त्र, राजनीती, व्याकरणात निपूण, विद्वान, साहित्य, तत्वज्ञाचा अभ्यासक होता. हनुमानाचा जन्म रामाच्या मदतीसाठी होता. सुग्रीवाचा मित्र होता. तसाच तो रामाचा सुद्धा मित्र होता. राम आणि लक्ष्मण सुग्रीवाच्या शोधात येतात तेव्हा सुग्रीव आपल्या राज्यात आलेले अथिति बालीने पाठविले आहेत कि नाही याचा शोध घेण्यासाठी हनुमानाला पाठवतो. हनुमान आपल्या पांडित्याने, मानसशास्त्र आणि तत्वज्ञाच्या आधारावर रामाला ओळखतो. बिभीषण रामाकडे येतो तेव्हा शत्रू पक्षातून आलेल्या बिभीषणाचा हेतू लक्षात घेण्यासाठी हनुमानाची निवड करतो. सीतेच्या शोधासाठी लंकेत जाण्यासाठी राम हनुमानाला पाठवतात. हनुमान बुद्धिमत्ता वरिष्ठमं आहे. अशोक वाटिकेत गेल्यावर हनुमान रामाच्या इक्ष्वाकू कुळाचे वर्णन करतो. सीतेच्या ह्रदयात विश्वास निर्माण करून आपली ओळख करून देतो. माणसाला ओळखण्याची ताकद हनुमानाजवळ आहे हे रामाने ओळखले होते. लंकादहनाचे कार्य हनुमानावर सोपवले होते. लंकादहन मध्ये राजनीती वापरून अर्धेकाम हनुमानाने पूर्ण केले. शत्रुपक्षाचा आत्मविश्वास संपवून टाकला. 


भक्त आणि भक्तीच मूर्तिमंत रूप हनुमान. रामाने हनुमानाला विचारले तुला काय पाहिजे असं विचारल त्यावर हनुमानाने आपली रामावरची भक्ती भाव कमी न व्हावा. रामाशिवाय दुसरा भाव निर्माण झाला नाही पाहिजे एवढच मागितले. जिथे रामकथा, स्तोत्र खऱ्या भक्ती भावाने चालू असते तिथे हनुमान वास करत असतात.

आजच्या समाजातरावण असुरी वृत्तीचे लोक लोकांना त्रास देत असतात. रामाच्या विचारांचे रक्षण करण्यासाठी हनुमानाची गरज आहे. जो दास आहे तोच वीर आहे हा संदेश हनुमान देतो.  केवळ शनिवारी देवळात जाऊन तेल आणि रुईची पाने अर्पण करून टिळा लावून दास होता येत नाही. मनात, ह्रदयात भक्तीचा भाव निर्माण करावा लागतो. केवळ रामाची, हनुमानाची वेशभूषा परिधान करून मालिका, नाटक, चित्रपट होत असतात. भक्तीसाठी चंदनापरी झिजावे लागते. तेव्हा दास बनता येते. commercial भक्तीत देव देवळात सुद्धा ना राहिला मग तो पैशाच्या भक्तीत कसा काय राहू शकेल ?  

हनुमान संकटमोचन आहेत आपल्या देशावर आलेलं महामारीच संकट  दूर व्होवो अशी प्रार्थना करूया. 

संकट कटै मिटै सब पीरा।
जो सुमिरै हनुमत बलबीरा।।

पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप।
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप।।


- महेश 



  

  • Share:

You Might Also Like

0 comments

All Rights Reserved, 2018 © by मुक्त मी . Powered by Blogger.