कर्तव्य, निस्वार्थ प्रेम, त्यागाचे लोकोत्तर जीवन - राम

By MAHESH BHUWAD - April 01, 2020


साधारण ८०-९० च्या दशकातील काळ असावा. लहान असताना शाळेत जाण्याच्या तयारीत असता रेडिओवरती कौसल्येचा राम बाई हे गाणं लागलं कि शांतपणे ऐकत बसायचो. माझं आवडतं गाणं असायचं. काय तो मस्त काळ होता लहानपणीचा. जसं जसं मोठं होत गेलो तस तशी हि गाणी मागे पडली. रेडिओची जागा FM ने घेतली. धावपळीच्या युगात कुठेतरी हे गाणं ऐकाला मिळालं तर खूप प्रसन्न वाटतं. हि प्रसन्नता आज मनुष्याच्या चेहऱ्यावरून हरवली आहे. भक्तीची जागा भीतीने घेतली. अवती भवती दाट भीतीच वातारण.  निराशेच्या अंधकारात माणूस हरवला आहे. अशा परिस्थिती काय करावं कोणालाच काही सुचत नाही देऊळ बंद तर कोणाला हाक मारायची. मन शांती आणि चित्त एकाग्र करण्यासाठी कुठं जायचे ? समाजाला मार्गदर्शन करेल प्रेरणा मिळेल आश्वासन देईल या परिस्थितीतून कोण बाहेर काढेल ? आत्मविश्वास, सर्वस्व गमावून बसलेल्या मनुष्याला कोण देईल विश्वास, कोण देईल बळ असं कोणी आहे का? होय याच उत्तर श्रद्धा आणि भक्तीत आहे. 

चैत्रातील दिवस चालू आहे. सध्याच्या बाहेरील दूषित, भयभतीत चिंताग्रस्त वातावरणात ऐकायला मिळतेय We are craving for Ramrajya.असं काय आहे कि आम्हाला रामराज्य हवं आहे? त्या काळातील शिक्षणव्यवस्था, कुटुंबव्यवस्था, धर्मसत्ता, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, सामाजिक नैतिक, सांस्कृतिक  मूल्ये, संस्कृती, एक विचारधारा. पाच हजार वर्षे अधिक लोटली तरीही आजच्या घडीला मार्गदर्शन ठरतेय. पण Communist वस्तूची आयात करणारे प्रश्नचिन्ह निर्माण करतात कसं शक्य आहे. रामायण काळातील व्यवस्था, आदर्श  या काल्पनिक गोष्टी नाही तर प्रत्यक्ष जीवन जगवून दाखवले आहे आणि समाजासमोर demonstration, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, जीवनधारा, विचारसरणी जगासमोर ठेवली आहे. आदर्श ठेवला.  "नर अपनी करनी करे सो  नर का  नारायण हो जाय."
Why do you smoke असं एखाद्याला विचारलं असता तो लगेच मोठया आवाजात उत्तरं देईल तुज्या बापाचं काय जातंय ? अशा लोकांना काय समजणार रामकालीन व्यवस्था आणि दुसरा असा एक वर्ग आहे आमच्याकडे वेळ (No Time) नाही. समजून घेणारी हि माणसे नाहीत पण त्या व्यवस्थेवर टीका करून प्रश्नचिन्ह उभी करणारे महाभाग आहेत. आम्ही आमच्या पद्धतीने जगू  वेस्टर्न कल्चर हीच आपली संस्कृती मानणारी लोक आपल्या संस्कृतीला रानटी, कमी लेखतात. माणूस सुशिक्षित झाला पण सुसंस्कृत नाही.

उत्सव प्रिय: खलु मनुष्य: उत्सव मानवी जीवनात थकलेल्या मनाला उत्साह, स्फूर्ती, चैतन्य देतात. निराश झालेल्या मानवाला पुन्हा उभारी देत आशेचा किरण दाखवतात. उत्सव सुट्टी साठी नसून एकत्र येऊन आनंद वाटण्याचा संदेश देतात. चैत्रातील गुढी पाडव्यानंतर येणारा रामनवमी उत्सव जीवनाला मार्गदर्शन, आश्वासन (God with you) देतो. रामाचा जन्म कथा ऐकण्यासाठी आणि गोष्टीत रमण्यासाठी नाही झाला. तसेच अयोध्येचा राजा बनून राहणे म्हणून नाही तर कर्तव्य, मर्यादा, जबाबदारी समजून आचरण करावे यासाठी मर्यादा पुरुषोत्तम रामाने जीवनात प्रत्येक गोष्टीचे पालन केलं आहे माता-पिता, गुरु, समाज, नीतिमूल्ये.  मनुष्य अवतारात ज्या गोष्टी करणं आवश्यक असतात ते रामाने मर्यादेत राहून पालन केलं आहे. केवळ रामाचा पाळणा म्हटला सुटवंडा खाल्ला आणि उपवास सोडला म्हणून रामनवमी साजरी होत नसते. रामाचा जन्म प्रत्येक व्यक्तीच्या ह्रदयात आणि डोक्यात झाला पाहिजे.

राम म्हणजे दिने दिने नवं नवं. राम नावात कोमलता, प्रेम, शीतलता, स्वार्थत्यागाची पराकाष्ठा म्हणजे राम. राम राजा असूनही ना सत्त्तेचा उन्माद ना अहंकार. मला राज्य नको, राज्याभिषेक नको असं म्हणणार व्यक्ती केवळ रामच. रामाने राज्यातील प्रत्येक व्यक्तीचे प्रेम मिळवले होते. प्राण जाय पर वचन ना जाय रघुकुलाचं पालन करून रामाने वारसा जोपासला. मनुष्याचे जीवन कसं असले पाहिजे हे रामाच्या चारित्र्याकडे कडे पाहून शिकावे. आजच्या शिकलेल्या नव्या पिढीला राम चरित्र फारसे माहित नाही. आमची शिक्षणव्यस्थेत राम येत नाही. पण जॉनी जॉनी एस पापा येतो. आम्ही आमच्या मुलाला इंग्रजी माध्यमात शिकवणार असं हट्टहास करणारे पालक कसं काय मुलाचं भविष्य घडवणार ? आई-वडील कामावर कुठून मिळणार संस्कार, कसे बनणार आदर्श, चारित्र्य. या शिक्षणाने कुठे जॉब मिळणार कोण विचारतोय. इंग्रजी येत असेल तर बोला. इंग्रजी भाषेत बोलणारे विद्वान आणि संस्कृत बोलणारे असंस्कृत असंच म्हणायचे. पैसे किती कमावतोय, शिक्षण किती आहे तरच मुलगी देऊ पण मुलगा निर्व्यसनी असावा धूम्रपान करणारा नसावा. कशी उभं राहणार विवाहसंस्था आणि कुटुंबव्यवस्था ? लग्न झाल्यावर वृद्धाश्रमात सोडणाऱ्या मुलांना वानप्रस्थाश्रम कोण समजावणार ?   

Man is animal नसुन तो  Rational animal, Social animal आहे. माणसाने माणसारखेच वर्तन केले पाहिजे. शिष्टाचार केला पाहिजे. तसं वर्तन नसेल तर तो Animal च आहे. खरंच आपण सुधारलो आहोत का? असा प्रश्न पडतो. शरीराने आणि बुद्धीने प्रगल्भ झालो पण सतसत विवेकबुद्धीने, करुणा, कर्तव्यपरायण, नम्रतेने कधीच नाहीच. धर्म म्हणजे काय ? आम्ही समजून घेऊ शकलो नाही. गंध लावणे, मंदिरात जाणे म्हणजे तो आस्तिक आहे असं नाही तर मी कोण आहे ? मी कोणीतरी आहे ? स्वतःला ओळखणे म्हणजे धर्म.

रामाचा जन्म राज्यगादी वर बसून राज्यकारभार करण्यासाठी झाला नव्हता. दरवर्षी रामनवमी येते रामनवमी उत्सव साजरा साजरा होतो. कथा, कीर्तन ऐकतो, पाळणा म्हणतो आणि उपवास सुटतो उत्सव पूर्ण होतो. एवढेच रामाला मनुष्याकडून अपेक्षित आहे का ? मानवाचा जन्म कशासाठी झाला आहे हे दाखवण्यासाठी रामाचा जन्म झाला आहे. रामाचा जन्म परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।। आज आपल्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टी लगेच मिळतात पण त्याची किंमत नसते. प्रत्येक गोष्टीसाठी हवा असतो हव्यास. पाहिजे अजून पाहिजे. रामाला राज्य मिळून सुध्दा त्याग केला. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला त्याग तितकाच मोठा आहे. रामाने कर्तव्याचं पालन करून रघुकुल परंपरा चालू ठेवली प्राण जाए पर वचन न जाए.

प्रत्येकाने रामाचे जीवन केवळ गोष्टी, कथा न समजता आणि राम केवळ देव होता असं बोलून आपण त्यांच्यावरती अन्याय करतोय. राम हा एक अवतार होता असं बोलून आपण आपली जबादारी, कर्तव्यापासून बाजूला होतोय. राम भगवान विष्णूचे अवतार असले तरी मनुष्य अवतारात जे दुःख, पीडा त्रास, विरह, वनवास  त्याग सहन करावे लागते ते सर्व रामाच्या जीवनात पाहायला मिळतेय. रामाचं जीवन समजून घेऊन त्यांचा उद्देश, संदेश मनुष्य जातीला होता. आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श पिता, आदर्श राजा, आदर्श बंधु (भाऊ), आदर्श मित्र सखा, आदर्श चारित्र्य. लोकोत्तर जीवन म्हणजे राम. त्याच प्रत्येक व्यक्तीने पालन करून कटिबद्ध झाले पाहिजे. येणाऱ्या पिढीने हा आदर्श जीवनात आणला पाहिजे. हीच संस्कृती आणि हाच धर्म आहे. तरच रामनवमी उत्सव खऱ्या अर्थाने साजरा केला आणि रामाला अपेक्षितच होता असं समजू.

पुनःश्च भूयोSपि नमो नमस्ते ।

- महेश 





  • Share:

You Might Also Like

0 comments

All Rights Reserved, 2018 © by मुक्त मी . Powered by Blogger.