वडापाव

By MAHESH BHUWAD - April 13, 2019



"वडापाव सिर्फ नाम हि काफी है !" ज्याच्या केवळ वासानेच पोटात कावळे ओरडू लागतात. जिभेवर रेंगाळणारा आणि प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा कोणाचं सकाळचा नाश्ता तर कोणाचं दुपारचं जेवण. अगदी कुठेही केव्हांही सहज हातात घेऊन पोटभरणारा असा वडापाव. कित्येकांनी वडापाव वर स्वतःच आयुष्य वेचलं तर कोणी वडापाव खाऊन पोट भरलं. हातगाडी, टपरी, स्टॉल, दुकाने थाटून कोटींची उलाढाल केली याच वडापाव वर. 

सर्वसामान्यांच वडापावशी असलेलं घट्ट नातं जसं मुंबईच लोकलशी. लोकलसोबत गर्दीतला गरमागरम वडापाव. खिशाला परवडणारा स्वस्तात मस्त. गरिबीपासून ते श्रीमंतांपर्यंत, लहानांपासून ते वृद्धापर्यंत मुंबईकरांचं फास्टफूड. छोटासा पण त्यात किती मोठा आनंद देणारा. उत्साह आणि ऊर्जा देणाऱ्या वडापावला एक सलाम तर बनतोच आहे. सर्वसामान्यांची मुंबईतील चाकरमान्यांची भूक भागवणाऱ्या गर्दीतल्या वडापावसाठी !



- महेश भुवड 



टिप : डॉक्युमेंटरी स्क्रिप्ट आहे. 





All Rights Reserved, 2018 © Mahesh Bhuwad



  • Share:

You Might Also Like

0 comments

All Rights Reserved, 2018 © by मुक्त मी . Powered by Blogger.