प्रेमा तुझा रंग कसा
By MAHESH BHUWAD - March 16, 2019
प्रेम कुणावर करावं ?
कुणावरही करावं
प्रेम स्वतः वर करावं
शत्रूवर देखील करावं
ज्याला तारायंचं त्याच्यावर तर करावंचपण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं.
आणि पारध्याच्या बाणांन घायाळ होऊन अरण्यात एकाकी
पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं.
चार पुरुषार्थाची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं
प्रेम कुणावरही करावं ।
पण आता आजूबाजूला प्रेम इतकं दिसू लागली आहे की प्रेम कुणावर करण्यापेक्षा प्रेम कुठं करावं असचं म्हणावं लागेल त्याला कारण हि तसंच आहे. टीव्ही मालिका, सिनेमामधून दिसणारी ऑन स्क्रीन केमिस्ट्री प्रत्येकक्षात लाईव्ह बघायला मिळतय. ऑफ स्क्रीनवर आजूबाजूचे लोक पहातात याच भानच राहत नाही. अश्लीलता बघण्यात नसते तर ती दाखवण्यात आणि पसरविण्यात असते. आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्तींचा वावर असतो. गार्डनमध्ये लहान मुले, ज्येष्ठ आजी आजोबा, रस्त्यावर चालताना या गोष्टीचा विचार करणं तितकचं महत्वाचं आहे. मोबाईलवरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात रेल्वे स्टेशनच्या लिफ़्ट मध्ये कपलचा अश्लील हावभावाचा व्हिडिओ तसेच रिक्षातून प्रवास करतानाचे अश्लील चाळे करणारी जोडप्यांचा व्हिडिओ आंबटशौकीन लोक आवडीने पाहिले जातात काय शिकणार आणि काय देणार समाजाला आदर्श. हीच आहे का ती तरुणाई फक्त प्रेमाच्या जाळ्यात अडकलेली. प्रेम फक्त प्रियसीवर आणि बायकोवरच करायचे? प्रेमाला मर्यादा नाही प्रेम म्हणजे..
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं
दूध जास्त तापवलं कि ओतू जात असतं
क्षणाचं भान ठेऊन देखील सुद्धा करायचं असतं
तुमचं आमचं अगदी सेम आहे हे
ओरडून सांगून जगाला दाखवायचं नसतं
कुठेही बसून चाळे करून अश्लिलता पसरवण्याइतकं प्रेम नसतं
शरमेनं खाली मान जातेय असं म्हणणाऱ्या तरुणाईला शोभण्याइतकं नसतं
एकमेकांना समजून घेऊन सोबत असण्यात असतं
खरं प्रेम एकमेकांना वाटण्यात आणि शेअर करण्यात असतं
प्रेमात कुठलेही बंधने नसतात म्हणून मिळालेल्या प्रेमाचा असा दुरुपयोग करायचा. स्वांतत्र्य मिळाले आहे कि त्याचा इतका गैरफायदा घेऊ नये. तरुण पिढने समाजात सार्वजनिक ठिकाणी सामाजिक भान ठेऊन वावरले पाहिजे. आपल्या आजूबाजूला घरात आणि घराच्या बाहेर देखील लहान मुले खेळत असतात या गोष्टी पाहून त्याच्या मनावर सुद्धा परिणाम होत असतो. येणाऱ्या सुजाण पिढीला खतपाणी घालण्यासारखं आहे. लहान केजीत जाणारी मुले सुद्धा असंच वर्तन करू लागली कि कसं होणार त्याचं? त्या गोड जीवाला हे माहीतच नसतं आपण काय करत आहोत. शाळा, कॉलेजात जाणाऱ्या इतपत राहिलं नाही ऑफिस मध्ये काम करणारी सुशिक्षित सज्ञान मंडळी यात देखील सहभागी असतात. काही झालं कि तरुणाईला नेहमी टार्गेट केलं जात बरं. समाजात वावरताना या गोष्टीचं गांभीर्य ओळखून एक सुजाण नागरिक म्हणून डोळ्यात अंजन घालून या गोष्टीला कोण जबाबदार आहे याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. समाजाचं स्वास्थ बिघडलं जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. स्वतःला आरशात पहा आणि आपली जबाबदारी उचला. येणारी पिढी तुम्हांलाच फॉलो करत घडणार आहे याचे भान जरासे राहू द्या !
- महेश भुवड
All Rights Reserved, 2018 © Mahesh Bhuwad
0 comments