दाग अच्छे हैं ।
By MAHESH BHUWAD - March 11, 2019
Surf excel दाग अच्छे हैं |
टीव्हीवर अनेक जाहिराती दाखविल्या जातात त्यात किती जाहिराती आपल्याला कळतात? काही जाहिराती मनोरंजन म्हणून तर काही जाहिरातींचा अर्थच कळत नाही. प्रॉडक्टच्या नावाखाली कंपन्या जाहिरातीमधून आपल प्रॉडक्ट कसं चांगलं आहे हे दाखवीत असतात. ग्राहकांनी आमच्या वस्तू खरेदी कराव्यात या उद्देशाने जाहिरातींचा वापर करून आकर्षित करून या जाहिरात लोकांच्या मनाच्या पटलावर छाप पाडत असतात. जाहिरात कोणतीही का असो ती पाहून आपण वस्तू खरेदी करत असतो. अशाचं एका जाहिरातीला लोकांच्या रोषाला सामोरे जावं लागलं आहे. Surf excel ची दाग अच्छे हैं ।
होळी काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. आपल्या आजूबाजूला देखील असचं काहीसं वातावरण पाहायला मिळत आहे. गल्ली बोळातून, रस्त्यावरून जाताना येताना एखादं पाण्याने भरलेला फुगा आपल्याला नक्कीच मारला असेल. होळीची तयारीसाठी लहान मुले सज्ज आहे मग यात जाहिरातीवाले कसे मागे राहतील. टीव्हीवर सर्फ एक्सेलची जाहिरात पाहिली. #RANGLAAYESANG एक मिनिटांची जाहिरात आहे. या जाहिरातीत पांढरा शर्ट परिधान केलेली एक चिमुकली सायकलवरून गल्लीतून जात असते. त्यावेळी बाल्कनीत असलेली काही लहान मुले तिला रंग मारतात. रंगाचे फुगे संपल्यावर ती त्याना म्हणते आता मारून दाखवा. रंग संपल्यावर ती मित्राच्या घरी जाते बाहेरून हाक मारते आता बाहेर ये सर्व रंग संपले आहे. छोटा मुलगा पांढरा शुभ्र कुर्ता -पायजमा आणि नमाजाची टोपी घालून बाहेर येतो त्याला सायकलच्या मागे बसवून मशीदीच्या दरवाजासमोर सोडते. जिने चढत मुलगा मागे पाहत स्मित हास्य देत बोलतो नमाज पडून येतो. त्यावर ती चमुकली म्हणते नंतर रंग पडेल तुझ्यावर. "अपनो के संग रंग लाये संग" अशी टॅग लाईन आहे. या मध्ये चमुकली हिंदू असून मुलगा मुस्लिम आहे. या जाहिरातीचे पडसाद सोशल मीडियावर देखील पडले. सुंदर गोड दिसणाऱ्या या चिमुकल्यांच्या हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतीक या जाहिरातून दाखवले आहे.

नेटिझन्सनी जाहिरातीला चांगलंच ट्रोल केलंय #boycottSurfExcel हॅश टॅग लिहून विरोध केला जातोय. या जाहिरातीवर हिंदू -मुस्लिम या नावाने धर्माचा रंग चढविला जातोय. मुळात जाहिरातीत एकोपा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. होळी हा मुखत्वे करून हिंदूंचा सण. मग मुलगी मुस्लिम आणि मुलगा हिंदू दाखवायचं होत अशी नेटकऱ्यांची मागणी. मुळात सण बाजूला ठेऊन आपण त्याला धर्मामध्ये का ओढत आहोत. कोणतीही गोष्ट आम्ही धर्माशी जोडतो. ब्रिटिशांच्या काळात असलेला हिंदू-मुस्लिम भेदभाव आजही चालूच आहे. हिंदूंनी प्रत्येकवेळी नमत का घ्याचं अशी भावना प्रत्येकांच्या मनात असते. सण, उत्सव अशा काही गोष्टी आहे ज्या माणसांना एकत्र आणतात. त्यावर धर्माचा रंग चढता काम नये. होळीमध्ये आपण नारळ अर्पण करतो तसेच माझ्या आयुष्यातील तर्क वितर्क, वाईट वृत्तीचं सुद्धा दहन केलं पाहिजे. समाजात असलेल्या उच्च-निच्च, गरीब-श्रीमंत मग तो कोणत्याही धर्माचा का असो असल्या कल्पनांच होळीत अर्पण केलं पाहिजे. होळी रंगाचा सण आहे. निखळ प्रेमाच्या रंगाची उधळण करणारा सण आहे. जीवन कलरफुल करणारा रंगीत करणारा आहे हे विसरता कामा नये.
0 comments