कोणता झेंडा घेऊ हाती...
By MAHESH BHUWAD - March 13, 2019
राजकारण म्हटलं कि सर्वसामान्य माणूस थोडसं चार हात लांबच. दोन वेळच पुरेसं जेवायला मिळतंय बसं झालं. आपली नोकरी, किंवा उद्योग धंदा बरा... अशी सर्वसामान्यांची समजूत. त्यापैकी काही लोक स्वतःहून पुढाकार घेत आहे. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये तसं चांगल्या माणसानं राजकारणात जाऊ नये. राजकारण म्हणजे गजकर्ण. खरूज नायटा यांवर वेळीच उपचार केलं नाहीतर पसरत जातं. भ्रष्ट नेते, घाणेरडे गलिच्छ राजकारण वगैरे वगैरे. वास्तविक परिस्थिती पाहता दिवसेंदिवस वाढत जाणारे घोटाळे, गुंडागर्दी. लाचलुचपत पाहता कोणीही चांगली माणसे राजकारणात फिरत नाही. या राजकारणात निवडणूका म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडीच म्हणावी लागेल. निवडणुकांमध्ये होणारा घोडेबाजार, चारित्र्य पात्रता न पाहून मिळणारी तिकीट, पैशाची होणारी उधळपट्टी, एवढा पैसा येतो कोठून? कार्यकर्त्यांचा जोश बघता काय मिळतं सर्वसामान्य माणसाला घरात पाणी आलं नाही म्हणून होणारी पायपीट पासून बस, लोकलच्या प्रवासात होणारी रोजची हाणामारी कोणाच्या वाट्याला? उन्हातान्हात बँक, सरकारी कामासाठी नुसती धावपळ, सर्वसामान्याची पळापळच. सुरक्षा तर रामभरोसे. किती अत्याचार वाढत आहे. बेरोजगारी, महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. पण सर्वसामान्य माणूस सहन करत आहे जोपर्यंत खिशात पैसा आहे तोपर्यंत. राजा (सरकार) तुपाशी आणि जनता उपाशी. लाखोंच्या गाड्या आणि झेड+ सुरक्षेत असणारे नेत्यांच्या वाट्याला उपभोग आणि जनतेच्या नशिबी भोग.
कार्यकर्त्यांचं जीवन म्हणजे रांधा वाढा, उष्टी काढा. गेली कित्येक वर्षे एकच पाडा ऐकत आलोय. दिवसा गाठीभेटी आणि रात्री चवदार पार्टी. हे कितीदिवस केवळ निवडणूका असे पर्यंत निवडणुकांचा निकाल लागल्यानंर काही दिवसांनी परिस्थिती जैसे थे! नेहमीप्रमाणे दिवस ढकलत काढायचा. मग पुन्हा पाच वर्षे वाट पाहत बसायचं. तेल गेले, तूप गेले हाती धुपाटणे आले. उमेदवाराची तिकीटे नेत्यांच्या मुलांना आणि पक्षाचा झेंडा आणि तोंडात कोण म्हणतं येणार नाय आल्याशिवाय राहणार नाय ! पण कार्यकर्त्यांच्या हातात कधी मिळणार तिकीट? कधी येणार तो दिवस सर्वसामान्य म्हणून कित्येक वर्षे कार्यरत असलेला निष्ठावान कार्यकर्ता आमदार, खासदाराची स्वप्न पाहत बसत साहेबांच्या ऑफिसात बसून काढायची. ऑफिस मध्ये बसून वेळ जातो कळतच नाही. पण हातात निवडणुकीच्या उमेदवाराचं तिकीट का मिळत नाही याचं कार्यकर्त्यांना कळत नाही.

घराणेशाही सालाबादप्रमाणे यंदाही चालूच आहे. तिकिटासाठी, जागांसाठी घरच्या मंडळींचा देखील विचार करणार नाही. मग तो कोणताही का पक्ष असो आपल्याला फरक पडत नाही. तिकीट मिळालं ना बस. नेत्यांची पोरं परदेशात चांगलं शिक्षण घेऊन डॉक्टर, वकील होऊन येतात. आणि आम्ही त्यांची वकिली करत बसतो. नेत्यांना खुर्ची आणि कार्यकर्त्याच्या हातात काय ? फक्त पक्षांचे झेंडे ! कधीतरी आपली कामे होतात कि नाही हे जरा डोळे उगडून बघ ! निवडणूका लढविण्यासाठी नेत्यांची पोरं आणि सेलिब्रिटी यांचीच मक्तेदारी चालत आली आहे. कार्यकर्ते उरले फक्त प्रचारापुरते. कार्यकर्त्यांनो आता तरी डोळे उघडा थोडंसं मागे सुद्धा वळून पहा कुटूंब आहे. जबाबदारी आहे बरीच कामे आहे आपली या नेतेमंडळी कडून जरून घ्यायची आहे आता पर्यंत वापर होत आला. जागो मतदार जागो नाहीतर शेवटी अशीच वेळ येऊन पडते कोणता झेंडा घेऊ हाती !
- महेश भुवड
All Rights Reserved, 2018 © Mahesh Bhuwad
0 comments