अलिबाग से आया है क्या ?
By MAHESH BHUWAD - March 22, 2019
अलिबाग किल्ला |
मित्रांसोबत अथवा ग्रुपमध्ये गप्पा, मजाक मस्ती करताना खिल्ली उडवताना एखाद्याच्या तोंडून सहज बाहेर पडलेलं वाक्य "अलिबाग से आया है क्या ! आठवतंय का? कधी काळी हा डायलॉग आपल्या तोंडून सुद्धा बाहेर पडला असावा. शाळा, कॉलेज, ऑफिस, नाक्यावरती गपाट्टप्पा करतेवेळी सार्वजनिक ठिकाणी चर्चेत असलेलं. एखाद्या व्यक्तीला हिणवताना तू मूर्ख आहेस का या अर्थाने वापरलेलं हे वाक्यं सर्रासपणे सिनेमा, नाटकं, मालिकांमधून एक "डायलॉग" म्हणून खूप फेमस झालं. हे वाक्य एखाद्याला उद्देशून बोललं कि हसू यायचं. सोप्या भाषेत सांगायचं झालं कि एखाद्याच्या साधेपणावर केलेली शाब्दिक कोटी. शहरात राहणारी माणसं सुशिक्षित सुसंस्कृत उच्च राहणीमान. आणि अलिबाग मध्ये राहणारी माणसं साधी. त्याचं राहणीमान पेहराव वरून तो कसा राहतो कसा दिसतो यावरून त्याची गणना ठरते. अशी अलिबागची ओळख.
अलिबाग समुद्र किनारा |
अलिबाग रायगड जिल्ह्यातील शहर. ठाणे, मूंबईपासून अगदी जवळ असलेलं ठिकाणं कोकणातील एक पर्यटन केंद्र. सुमद्रकिनारा, अलिबाग किल्ला अशी अलिबागची ओळख. नारळी पोकळीच्या बागा, बिचेस परिसर, ऐतिहासिक वारसा पाहता "मिनी गोवा" असचं म्हणावं लागेल. वीकेण्डला गर्दी करणारं अलिबाग मुबंईकराचं सेकण्ड होम. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून उसंत मिळावी शांतता, स्वच्छ हवा, एकांत मिळावा शरीराला मनाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी लोक अलिबागला पसंती देतात. वर्षातला शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी कित्येक लोक अलिबागला येतात. फक्त पिकनिक स्पॉट म्हणून अलिबागची ओळख नाही तर ऐतिहासिक वारसा लाभलेलं एक शहर. निसर्गाचं दैवी देणं मिळालेलं अलिबाग. शिवाजी महाराजांच्या आरमारांपैकी कान्होजी आंग्रे यांनी येथे आरमार स्थापन केलं या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे होते. अशा धुरंधर कर्तबगार व्यक्तीची ओळख आपण पुसू पाहतोय आणि एक वेगळीच ओळख निर्माण करतोय अलिबाग से आया है क्या ! तिथल्या मातीशी एकनिष्ठ असलेल्या, साधेपणा हि त्यांची ओळख या लोकांची, गावांची आपण खिल्ली उडवून अपमान करत आहोत तेथील वातावरण गढूळ करत आहोत हे विसरता कामा नये.
अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील सूर्यास्त |
- महेश भुवड
All Rights Reserved, 2018 © Mahesh Bhuwad
0 comments