मुझे ऑफिस जाना हैं ! (I want to go to the office)

By MAHESH BHUWAD - March 27, 2020


मुझे ऑफिस जाना हैं ! (I want to go to the office)


आठवतंय का बरं हे गाणं  ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे ।।
पण या गाण्याचा आता काय संबंध ? पावसाळा नाही पण परिस्थिती तशीच आहे बाहेर कोरोना आहे. कोरोना नावाचं व्हायरस जगभर धुमाकूळ घालतयं. त्यात आपल्याकडे संपूर्ण देशभर लॉक डाउन आहे. बाहेर जाऊ शकत नाही. घरीच रहा असं सांगितलं जातंय. २१ दिवस घरात बसून करायचं तरी काय ? घरात ऑफिसची कामे सुद्धा होत नाही खूप कंटाळा आला आहे. काय करावं काही सुचत नाही. अशावेळी जुन्या शक्कल लढविल्या जात आहे. कोणी कॅरम, बुद्धीबळ, व्यापार, चोर पोलीस, असे विविध खेळ खेळत आहे. काही का असो पण कुठेतरी छंद झोपसला जात आहे जुन्या आठवणी पुन्हा एकदा नव्याने ताज्या होत आहे. नवींन गोष्टींना उजाळा मिळत आहे खूप बरं वाटतंय संपूर्ण परिवार एकत्र सोबत आहे एरवी असं चित्र कधी पहायला मिळत नव्हते. आज कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळत आहे. भारतीय संस्कृतीत कुटुंबसंस्था प्रमुख स्तंभ आहे जो वेस्टर्न जीवनशैली भारतात रुजू लागल्यामुळे कुटुंबसंस्था ढासळली होती. 

कोरोनामुळे जगावर दुष्परिणाम झाले कुटुंब उध्वस्त झाले, सर्व व्यवहार ठप्प झाले. भारतावर त्याचे दुष्परिणाम झाले पण कुठेतरी चांगले परिणाम सुद्धा दिसू लागले आहे. आजच्या धावपळीच्या युगात कोणाकडे वेळ आहे. जो तो आपल्या कामात व्यस्त आहे. सर्व लाईन व्यस्त आहे घड्याळाच्या काट्यावर चालणारी मुंबई थांबली आहे. आजवर एकच गोष्ट ऐकत आलो होतो वेळ नाही रे पण आताच्या परिस्थितीत खूपच वेळ आहे. तो वेळेचा कसा उपयोग करायचा ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. 

ऑफिस मध्ये असलो कि काम करत वेळ कसा निघून जायचा कळत नव्हतो ८-९ तास काम करत थकून भागून घरी येत थकलेले शरीर पाहून घराच्या व्यक्तीशी सुद्धा ठीक बोलू शकत नसत, संवाद होत नसत कुठंतरी दुरावा निर्माण होत होता. खचाखच भरलेल्या लोकलचा प्रवास नाही ते बरं आहे. ऑफिस च्या कामामुळे वाचन, लिखाण कला, छंद काळाच्या पडद्याआड गेले होते पण कोरोनाच् निमित्त ठरलं आहे या गोष्टींना पुन्हा एकदा उजाळा मिळतोय आहे. 

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असं चित्र पहायला मिळतं होते पण आता असं म्हण्याची वेळ आली आहे गेलेले दिवस परत आले आहे.  आले ते दिवस ताज्या झाली आठवणी. पण ऑफिस च काय ? 


- महेश 














  • Share:

You Might Also Like

0 comments

All Rights Reserved, 2018 © by मुक्त मी . Powered by Blogger.