तू गेलास... त्यानंतर मागे वळून बघितलेस का रे परत कधी ? काय झालं असेल तुझ्यामागे ? तुझ्यावर उत्कट प्रेम करणाऱ्या माणसाचं तुझ्याशिवाय ? तुला प्रश्न पडला असेल कि नसेल माहित नाही. जीवन कसं अगदी भकास वाटतंय. निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आता तरी मागे वळून बघ... आमच्यासाठी नाही. तू नाती जोडलीस नवीन जोडलेल्या नात्यांवर प्रेम केलंस त्याना आपलसं केलंस त्यांच्यासाठी. जिच्यावर तुझं प्रेम जडलं तिला भेटण्यासाठी... खरं सांगू प्रेम होत ना तुझं तिच्यावर...






आली गटारी.... !!! आता हे काय नवीन ? नवीन असं काही नाही, यंदाही सालाबादप्रमाणे... हो, तुम्ही बरोबर वाचलात. होय, आली गटारी.... पण आली दिवाळी असं आहे. ते फक्त दिवाळीत. हे गटारीसाठी, कमाल आहे बुवा ! लिहणाऱ्यांची कमाल आणि पिणाऱ्यांची धमाल. गटारी सण मोठा पिणाऱ्याला नाही तोटा. हा सर्व आटापिटा फक्त गटारीसाठी. आपल्याकडे गटारी आणि थर्टी फर्स्ट धूमधडाक्यात साजरे केले जातात. अलीकडच्या लोकांनी गटारीला सुद्धा सणामध्ये...





बरेच दिवस काही लिहिले नाही. वेळ नाही म्हणून... हे एक कारण झालं. आर्टिकल ना ब्लॉग. घडलेल्या घटनांविषयी आपण काय विचार करतो. ती घटना घडली का घडली ? कशी घडली ? कुठे घडली ? केंव्हा घडली ? कधी घडली ? या सर्वांचा एकूणच बातमीमध्ये विचार केला जातो. अशा रोजच्या बातम्या, घटना न्यूज पेपर मधून वाचत असतो. पत्रकारितेचा पेशा आहे म्हणून वाचावेच लागते. "बातमीतला मी" बातमीच्या पलीकडे सुद्धा...
आज जागतिक पर्यावरण दिन आहे. काहींना ५ जून हि तारीख "पर्यावरण दिन" म्हणून साजरा करतात हे माहित असते. याला पाठपुस्तकीज्ञान म्हणावे कि सोशल मीडियावर ट्रेण्डिंगला फॉलो करणारे नेटवर्किंग जाळे. प्रत्येक्षात पर्यावरण बाबत आपण किती जागरूक आहोत ते कळते. महाराष्ट्रात उष्णतेचा पारा ४७ डिग्री सेल्सियस पेक्षा अधिक. जगात सर्वाधिक तापमानाची नोंद झालेला चंद्रपूर जिल्हा (२८ मे, २०१९). नागपूर, विदर्भ मध्ये उष्णतेची लाट पसरली. कित्येकांनी आपले...





गुड मॉर्निंग ! एक कप चहा शहरात, ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येकाची सुरुवात सकाळच्या गरमागरम चहाने होते. घर, ऑफिस, कॉलेज कँटींग तर काहींची टपरीवरच्या चहाने. सकाळी उठल्यावर चहा हवाच. त्याशिवाय फ्रेश कसं वाटेलं. काहींना तर झोपेतून उठल्यावर बेड टी लागतो. तर कुणाला जेवण झाल्यावर. "चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो..." कॉफी पिणं म्हणजे स्टेटस असा एक समज असायचा. नातेवाईक, मित्र-परिवारांच्या घरी, ऑफिस, मीटिंग, हॉटेलमध्ये गेलं कि आवर्जून विचारलं...








हल्ली वाचायला वेळच मिळत नाही ! मोबाईल हातात आल्याने पुस्तकाची जागा मोबाईलने घेतली. ई-बुक जमान्यात हातात पुस्तक घेऊन वांचण्यातला आनंद, सोबत हाताचं बोट तोंडाकडे नेत जिभेला लावीत पुस्तकाचं पान उलटण्यातील मज्जा काही औरच होती. आज तो आनंद गेला आणि सोबत हातातील पुस्तक हि गेलं. "वाचालं तर वाचाल" तसा नेहमी विचारला जाणारा मराठी निबंध विषय आहे. एकवेळ आपण पुस्तक वाचत असू पण दुसऱ्याला वाचण्याची आवड निर्माण व्हावी या अनुषंगाने...






सुंदर मी होणार... सुंदर मी होणार... wow ! so beautiful, आता तरुण मी दिसणारं ना पिअर्स, दव, ना संतूर सोपं ,चेहरा माझा अधिक खुळणार ना हळद ना चंदनाचे गुण त्वचा आणखी उजळणार सौंदर्यात भर टाकणारी शस्त्रक्रिया मी करणार अनेकांच्या नजरा माझ्यावर खिळणार सुंदर मी होणार, सुंदर मी दिसणारं.... मी सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. चार चौघात उठून दिसावं. लग्न, समारंभ, पार्टी, सार्वजनिक आणि...









राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा । नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ।। मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा । प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।। ज्या मातीत जन्माला आलो त्या काळ्या मातीतल्या सहयाद्रीच्या पर्वतरांगांमधील, डोंगर, दऱ्या, नद्या पठार, मैदान, घाटमाथा अशा विविध प्रदेशांनी बनलेला असा अमुचा "महाराष्ट्र देशा." देशगौरवासाठी झिजला, सह्याद्रीचा सिहं गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला "महाराष्ट्र माझा " ...
"वडापाव सिर्फ नाम हि काफी है !" ज्याच्या केवळ वासानेच पोटात कावळे ओरडू लागतात. जिभेवर रेंगाळणारा आणि प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा कोणाचं सकाळचा नाश्ता तर कोणाचं दुपारचं जेवण. अगदी कुठेही केव्हांही सहज हातात घेऊन पोटभरणारा असा वडापाव. कित्येकांनी वडापाव वर स्वतःच आयुष्य वेचलं तर कोणी वडापाव खाऊन पोट भरलं. हातगाडी, टपरी, स्टॉल, दुकाने थाटून कोटींची उलाढाल केली याच वडापाव वर. सर्वसामान्यांच वडापावशी असलेलं घट्ट नातं जसं...





ऐ.. तू कोणती मालिका पाहते ? मी, ना ...... हि मालिका बघते. पण तू हि ....... सुद्धा मालिका पाहत जा, नवीनच सुरु झाली आहे. खूप छान आहे. कलाकार देखील चांगले आहेत. एकदम मस्त स्टोरी, कौटुंबिक पण आहे. हो... किती वाजता, कोणत्या चॅनेलवर ? ..... या चँनेलवरती. संध्याकाळी ... वाजता. मित्रांनो हि कोणत्या मालिकेची प्रमोशन ऍड नाही, हि तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनातील मनोरंजन विश्वातील गोष्टींविषयी बोलत आहे. अगदी सहज कुठेही घर, गार्डन...













लोकप्रिय ब्लॉग : १. मी गार्गी बोलतेय.. २. दाग अच्छे है ! ३. प्रेमा तुझा रंग कसा ४. अलिबाग से आया है क्या ? ५. शिवाजी महाराजांचे आठवावे रूप । आठवावा प्रताप ।। ६. कोणता झेंडा घेऊ हाती ७. आमचा नगरसेवक ८. डेली सोफ मालिकांना BREAK कधी लागणार ! वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले वाचनीय लेख : १. बहरलेला हिरवागार श्रावण आला... ( दैनिक...
जनमत पक्ष नमस्कार ! ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. बातमी आहे निवडणुकीच्या रणधुमाळीची. अवघे दोन दिवस राहिलेत असून प्रचाराचा जोर आणि कार्यकर्त्याचा उत्साह शिगेला पोहचला आहे. घरोघरी मतदारांच्या भेटी घेऊन आपल्या सामाजिक कार्याची माहितीचा तपशील देत कार्यकर्त्यानी "कोण म्हणत येणार नाय आल्याशिवाय राहणार नाय" चा नारा देत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न उमदेवार आणि पक्ष कार्यकर्त्यांनी केला आहे या सविस्तर बातमीचा आढावा घेतला आहे...
All Rights Reserved, 2018 © by मुक्त मी . Powered by Blogger.