ब्रँडनामा - येवले अमृततुल्य चहा
By MAHESH BHUWAD - June 04, 2019
गुड मॉर्निंग ! एक कप चहा

पुणे तिथे काय उणे... या अर्थाची म्हण प्रत्येक्षात साकारली आहे येवल्यानी. पुण्यातले येवले कसे मागे राहणार ? पुणेकरांच्या पसंतीस उतरलेले. अस्सल चहाची चव सोबत गुणवत्ता, स्वछता, चहा सोबत असलेली रिलेशनशिप, उत्तम सेवा प्रस्थपित करून चहाच्या व्यवसायाला ग्लोबल स्वरूप प्राप्त करून दिलं. या कपभर चहाचा मैलोनमैल प्रवास सुरु झाला पुण्यातल्या आस्करवाडीतून. वडिलांचा चहाचा शौक आणि चहाच्या दुकानातला अनुभव घेऊन सुरु केलेला एम जी रोडवरल्या दुकानाने चहाची सुरवात झाली. पुणेकरांनी येवल्यांशी घट्ट नातं जोडलं गणेश अमृततुल्य दुकानाने. काळाच्या ओगात गणेश चहा काहीसा मागे राहिला पुन्हा एकदा दर्जेदार चहासाठी, चहाच्या संशोधनासाठी येवले बाहेर पडले. गेलेली चहाची चव प्राप्त करून देण्यासाठी या व्यवसायात उतरले. नवनाथ आणि निलेश येवलेनी हा व व्यवसाय आपल्या हाती घेतला काही वर्षातच त्याला एक नवं ग्लोबल स्वरूप प्राप्त करून दिलं. चहा पिल्याने अॅसिडिटी होते पण येवल्यांच्या चहाने ना जळजळ ना अॅसिडिटी, केमिकल विरहित साखर. फिल्टर पाणी, चहाची स्वच्छ भांडी, हि येवलेंची खास वैशिष्ट्ये. उत्तम मार्केटिंग, सर्व्हिस आणि चहाची चव या बळावर चहाला मोठं केलं. जवळपास महिन्याला १२ लाखांचा धंदा करून या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून दिली. वार्षिक उत्पन्न १ कोटी २० लाखाची उलाढाल करून मराठी माणूस सुद्धा मागे नाही हे दाखवून दिलं गुजराती आणि मारवाडी लोकांची या क्षेत्रात असलेली मक्तेदारी मोडीत काढली. अनेकांना रोजगार संधी सुद्धा उपलबद्ध झाल्या आहेत. व्यवसाय करण्यासाठी त्याला मोठं स्वरूप प्राप्त करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनत लागते हे येवल्यानी दाखवून दिलं. पुढे पुणेकरांचा आवडता चहा कोणता असा प्रश्न विचारला तर..."येवले अमृततुल्य चहा" असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. आमची शाखा कुठेही नाही या वृत्तीला बाजूला ठेऊन जगभरात कुठेही जाऊ येवले चहा पिऊन येऊ. पृथ्वीतलावर एकमेव पेय असेल तर ते चहा. चहा बनवणं सुद्धा हि एक कला आहे आणि त्या कलेला ग्लोबल ब्रँड बनवून आपल्या कष्टानी, मेहनतीने आणि विश्वासाने येवल्यानी चहाला "अमृततुल्य" बनविले.
- महेश भुवड
0 comments