शिवाजी महाराजांचे आठवावे रुप । आठवावा प्रताप ।।
By MAHESH BHUWAD - February 18, 2019
हा किल्ला कोणी बांधला ? शिवाजी महाराजांनी ! यार ... कसा बांधला असेल ? असे अनेक प्रश्नांचं ओझं सोबत घेऊन रानवाटांमधून पायपीट करीत वाऱ्याची मंद झुळूक अंगारावती घेत हळूहळू पुढे पाय टाकीत गर्द झाडाझुडपांतून, घनदाट अरण्यातून वाट काढीत डोंगररांगांमधून पालापाचोळ्यामधून गड सरकरणाऱ्या दुर्गयात्रींना, गिरिशिखरांवर भ्रमण करणाऱ्या गिर्यारोहणांना सहयाद्रीच्या कडेकपारीतून दऱ्याखोऱ्यातून निधड्या छातीमधून घोड्यांच्या टापांचा आवाज साद घालतो " वेडात मराठे वीर दौडले सात. " हे कसं शक्य आहे ? गडावर चढताना नाकी नऊ येतात बस्स... आता नाही दमलो रे बाबा ! त्याचवेळी एक बुलंद आवाज कानी येतो " उठ जागा व्हो... आणि आपल्या धमन्यात खेळव मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त. " आणि खरचं अंगावरती काटा उभा राहतो थकलेल्या पायात एक नवी संजीवनी प्राप्त होते. घामाने भरलेल्या चेहऱ्यावरती एक चमक येते स्फुरण येते हे चैतन्य आहे "हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेच्या राजाचं. "
१९ फेब्रुवारी १६३० शिवाजी महारांचा जन्मदिवस केवळ महाराष्ट्राच्या इतिहासात नव्हे तर जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला असा हा दिवस. महाराष्ट्र्याच्या भोगौलिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाला एक नवी पालवी फुटली असा हा दिवस. चार मावळे सोबत घेऊन रायरेश्वरच्या मंदिरात शपथ घेऊन शिवबाने हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधल आणि पुढे याच शिवबानं ४ दशके स्वराज्यासाठी रयतेसाठी खर्ची केली असा हा ज्वलन्त इतिहास पाठपुस्तकातून, छान छान गोष्टींमधून कधी वर्तमानपत्रांतून तर कधी शिवप्रेमींच्या लिखाणातून वाचत आलो आहोत. तर कधी शाहिरांच्या पोवाड्यातून महाराजांची महती सांगणारा जाज्वल्य इतिहास. कधी नाटकातून तर कधी टीव्ही मालिकांमधून पाहत आलो आहे. या राजान रयतेवर प्रेम केलं खूप काही भरभरून दिलं दोन्ही हातात मावता येणार नाही एवढ. मनात प्रश्न उभा राहतो मग आम्ही काय दिलं स्वराज्यासाठी ? काय महाराजांना अपेक्षित होत लोकांकडून ? हाच काय तो हट्टहास आहे जो महाराजांनी केला होता. अफजलखानाच्या भेटीच्या वेळी खान शिवाजी महाराजांना म्हणतो "आओ शिवाजी गले लग जाओ. महाराजानं खानाला आलिंगन द्यावं अन खानानं पाठीत खंजीर खुपसावं असा दगा फटका करणारे आज आपलेच लोक आपलेच ओठ एकत्र येऊ शकत नाही. मेंढऱ्याच्या कळपातून वाघाची डरकाळी कशी काय फुटणार ? चार बंदिस्त भिंतीत आणि बाहेरील घुसमट वातावरणात कसा शिवाजी कळणार ? वाघाचं काळीज निर्माण करायला वाघचं होऊन जन्माला यावं लागतं.
हिस्टरी रिपीट असं म्हटलं जातं. शिवाजी महाराजांचे किल्ले, सह्यादीच्या डोंगररांगा इतिहासाची साक्ष देत ३५० वर्षे अधिक उलटून गेली तरी आजही इतिहासप्रेमींना, दुर्गप्रेमीना खुणावत असतात. शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी मी हा लेख लिहित नाही. महाराजांचा इतिहास माहित नसलेला विरळच. आजपर्यंत आपण इतिहासाचं वाचत आलो आहे. एक सुंदर वाक्य आहे. "तरुणाई ने इतिहास वाचायचा नसतो तर तो घडवायचा असतो." पुस्तकातून आणि स्पर्धापरीक्षेतून कसा काय इतिहास घडणार ? केवळ शिवाजी महाराजांचं घोषणा देत. दाढी आणि अर्ध चंद्रकोर ठेऊन रक्त सळसळत नसतं त्यासाठी मनात अग्नी निर्माण करावा लागतो. ती ज्योत ठिणगी ह्रदयात पेटवावी लागते. तर अशी म्ह्णायची वेळ येणारच नाही "शिवाजी जन्माला यावा पण दुसऱ्यांच्या घरात." काय शिकलो पेक्षा कसा इतिहास शिकवला मास्तरांनी कसे धडे शिकवले. इतिहास गोष्टीपुरताच राहिला. शिकवणाऱ्यांनी इतिहासाचा विषय म्हणून शिकवला आणि विद्यार्थ्यांनी जन्मतारीख पाठ करावी तसा घोकमपट्टी करत गिरवला पण तो मनावर कधीच गिरवला गेला नाही. हे कोणाचं दुर्देव म्हणावं. मग कसे तयार होणार स्वराज्याच मावळे ? स्वराज्याचं वाररसदार कसे काय गड किल्ले राखू शकणार ? फक्त जातीत जन्माला आलो म्हणून कोणी मर्द मराठा होत नसतो. वेळ आली आहे पुनश्च इतिहास घडविण्याची. "शिवरायांचे आठवावे रुप आठवावा प्रताप !"

सह्याद्रीचा पर्वत ताठ मानेने उभा आहे. महाराजांनी बांधलेले स्वराज्यातील किल्ले पराक्रमाची अभिमानाची साक्ष देत उभी आहे. ज्यांनी ज्यांनी स्वराज्यासाठी महाराजानां वचन दिलं त्यांनी आनंदाने स्विकारत पूर्ण केलं. पण त्या किल्ल्यांचा पराक्रमाचा इतिहास आपण आज पुसून टाकत आहोत. महाराष्ट्रात साडेतीनशेच्या वर किल्ले आहेत. यातील काही किल्ले नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गडकिल्ल्यांचे बुरुज ढासळलेले आहेत. तेथील गडांना भेटी देणारे लोक तेथील परिसर वातावरण अस्वछ करीत आहेत. दुर्मिळ वस्तूंची नासधूस करीत आहेत. आपल्या नावाचं लेबल लावलं जात आहे त्याचं रक्षण करणं हि आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी तोरणागड जिंकला. महाराजांनी किल्ले कसे बांधले. भक्कम तटबंदी बांधताना मोठ मोठे दगड कसे वरती चढवले असतील. कोणती अत्याधुनिक यंत्र सामग्री वापरली गेली कि जे किल्ले ऊन वारा पाऊस झेलीत आजही भक्कम स्थितीत उभे आहेत. कोणता दृष्टिकोन समोर ठेऊन किल्ले बांधले. त्यांच्या आणि कारागिरांच्या बुद्धिमतेचे कौतुक करणारे इतिहासकार आणि इंजिनिअर देखील थक्क होतात. शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीकोन, नेतृत्व गुण, प्रजेला सोबत घेऊन चालणारा, धर्मसहिष्णू राजा, युद्धनीती, डावपेच, मुत्सद्दीपणा, शौर्य, पराक्रम, कुशल संघटक, धाडस, शारीरिक सामर्थ्य, निष्ठा, निश्चित ध्येय, शत्रूवर वचक ठेवणारा, गनिमी काव्याने शत्रूला नामोहरण करणारा, मानसिक स्थिती अशा अनेक गुणांनी समृद्ध असलेल्या गुणांवर विश्वास आणि त्यावर विचार न करता महाराज एक अलौकिक होते. एक चमत्कारी असं काही मानून त्याचं जीवन समजून न घेता वास्तवापासून दूर होऊन आपण आपली जबाबदारी बाजूला सारतो. "लाख मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे." असा न्यायप्रिय राजाचं चरित्र पुन्हा पुन्हा वाचावसं वाटत स्फूर्ती प्रेरणा देणारे गड किल्ले यांची जबादारी घेणं हे स्वराज्याचं वारसदार म्हणून आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध होऊया.
- महेश भुवड
All Rights Reserved, 2018 © Mahesh Bhuwad