पडद्यामागील हिरो : घेतला वसा समाज कार्याचा
By MAHESH BHUWAD - January 03, 2019
टीप : सदर लेख ठाणे वैभव दैनिक वर्तमानपत्रात मंगळवार दि. ७ ऑगस्ट, २०१८ रोजी प्रकाशित झालेला आहे. याची वाचकांनी नोंद घ्यावी.
डॉ. भारत वाटवानी आणि सोनम वांगचुक
|
सोनम वांगचुक |
थ्री इडियट्स चित्रपटातील आमिर खाननं केलेली फुंसुक वांगडुची भूमिका हि वांगचुक यांच्या कार्यावर आधारलेली आहे. पडद्यावर वांगडुच्या भूमिकेचे कौतुक झाले पण पडद्यामागे खरा हिरो अर्थात सोनम वांगचुक आहेत. जम्मू आणि काश्मीर भागातील लडाख येथील छोट्याशा दुर्गम भागात केलेलं शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आहे. लडाखमधील एका छोट्याशा गावात जन्मलेले वांगचुक यांना शिक्षण घेता आलं नाही. वयाच्या ९ व्या वर्षी तिसऱ्या वर्गात होते. शाळा, वर्ग, शिक्षा यांची फारशी ओळख नव्हती. ९५ टक्के विध्यार्थी नापास अशी तेथील शिक्षणपद्धतीची ओळख, शिक्षण पद्धती पूर्णपणे अपयशी ठरली होती. सरकारी शाळा होत्या पण त्या शाळांतील पाठयपुस्तकात लडाखचा उल्लेख नव्हता. शालेय जीवनात बराच वेळ वर्गाच्या बाहेर उभा राहण्यात गेला. पुढे दहावी-बारावी नंतर विज्ञान विषयात आवड निर्माण झाली. लेन्सेस आणि मिरर या दोन गोष्टीमध्ये विशेष रुची होती. परिस्थितीवर मात करत मेकॅनिकल इंजिनीअर बनले. लडाखमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशील शाळा चालवतात. शिक्षण कागदोपत्री अर्थात पाठयपुस्तकापुरते मर्यादित नको व्यावहारिक पाहिजे. मातृभाषा चांगली असेल, तर तुम्ही जगातील कोणतीही भाषा सहज शिकू शकता असे त्यांचे विचार आहेत. त्यांनी उर्दू, इंग्रजी आणि हिंदी भाषेचा अभ्यास केला. निसर्गाच्या सानिध्यात राहून खूप काही शिकता येतं. सरकारी शाळा सुधारण्यासाठी स्थानिक लोक, खाजगी संस्था, विद्याथी आणि पालक यांच्या मदतीने सरकारला तेथील शिक्षण पद्धतीची दखल घ्यावी लागली. हि गोष्ट फारशी सोपी नव्हती. उन्हाळ्यात पाण्याची समस्या सोडवण्यासाठी हिवाळ्यातील बर्फ साठवून ठेवण्याचं तंत्र त्यांनी विकसित केलं. थंडीमध्ये बर्फाचे शंकू करण्याची संकल्पना त्यांचीच होती.
बर्फ स्तूप प्रयोग |
कोनच्या आकारात पाणी गोठवून ठेवणे ज्यामुळे कोनच्या वरच्या भागात फक्त थेट सूर्यकिरणे पडतील व बर्फ पायथ्याला गोठत राहील. एका शंकूमध्ये तीन मिलिमिनियम लिटर म्हणजे ३० लाख लिटर पाणी (३० टँकर) उपलब्ध होईल असं तंत्र विकसित केलं. या कोणाचा आकार बौद्धस्तुपासारखा असल्याने त्याला Ice Stoop असं नाव देण्यात आले. उन्हाळ्यामध्ये लडाखमधील गावांची व शेतीची तहान भागवत आहे. सोलार एनर्जीचा प्रयोग राबविला. मात्र तेथील शाळा मध्ये कॉम्पिटिशन आहे ते फक्त स्वतःसाठी जीवघेण्या स्पर्धेत विद्यार्थांच खरं बालपण, शिक्षा कौशल्य हरवत आहे त्यातूनच वैर, द्वेष, संघर्ष, आत्महत्या वाढत आहे. स्पर्धा हि फक्त स्वतःसाठी करा दुसऱ्यांसाठी नाही ही त्यांची शिकवण. खरंच नावात काय असतं ते फक्त तुमच्या कर्तृत्वात.
डॉ. भारत वाटवानी |
डॉ. भारत वाटवानी यांच्या कार्याचे मोल अनन्यसाधारण आहे. मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचा सांभाळ करायचा, त्यांच्या नातलगांना शोधून त्यांचे पुनर्वसन करायचं. रस्त्यांवरील लोकांना सांभाळणे, मानसिक रुग्णांना मोफत आश्रय, जेवण आणि उपचार करून त्यांच्या नातेवाईकांशी, परिवारांशी भेट घालून देणं असं विलक्षण काम डॉ. भारत वाटवानी आणि त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता वाटवानी यांनी श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाऊंडेशन मार्फत केलं. या दाम्पत्याने जवळपास सात हजार मनोरुग्णांना आसरा दिला. ज्येष्ठ, वयोवृद्धांना त्यांच्या नातेवाईकांशी भेट घडवून दिली. डॉ. भारत वाटवानी दाम्पत्यांची समाजाविषयीची असलेली आपुलकी, समर्पणाची भावना, आत्मीयता त्यांच्या कार्यातूनच दिसते. त्यांच्या कार्याविषयीचा बोलबाला समाजात प्रसिद्धीच्या माध्यमातून दिसलाच नाही. दिसला तो फक्त नम्रतेच्या काहीतरी करून दाखवण्याच्या भावनेतूनच. हा पुरस्कार साद घालतात तो केलेल्या कार्याचा कर्तृत्वाचा अखंड झरा परिश्रमाने. त्यांच्या या कार्याची दखल केवळ भारताला नव्हे तर जगभरातील देशांनाही घ्यावी लागते. समाजाला प्रेरणा आणि स्फुर्ती देईल असं पुरस्कार विजेत्याचं काम आहे. प्रत्येकाने पुढे येऊन त्यांचं कार्य महत्ता समजून घेतली पाहिजे. हे समाजातील नागरिकांचे कर्तृत्व आहे. कार्याबद्दल आपण फारसं बोलू शकत नाही. एवढंच नक्की बोलू शकतो.
यश चालून आले दारी... !