वडील... "बाप माणूस"
मित्रांनो, मी माझ्या लिखाणाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचत असतो. नवीन विषय घेऊन मी माझे ब्लॉग, आर्टिकल पाठवत असतो. नवीन संदर्भ, नवीन विषय हाताळत प्रबोधन करणे हाच लिखाणाचा उद्देश आहे. आजचा विषय ही तितकाच special आहे. "आजचा लेख वडिलांना समर्पित". "Father's day".
जसा Mother's Day तसा Father's Day.
ख्रिस्ती कैलेंडर नुसार साधारण जूनच्या तिसर्या रविवारी Father's day जगभर साजरा केला जातो. Father's day ची अशी निश्चित तारीख उपलब्ध नाही.
यः पाति स पिता अर्थात "जो रक्षण करतो तो पिता" Father is he who protects. आपल्या संस्कृतीत मातृत्व देवो भव, पितृ देवो भव आहे तसे पाश्चात्य देशाच्या सभ्यता मध्ये Father's day.
दरवर्षी Father's day येतो आणि जातो पण आपण काय करतो? कसं celebrate करतो? हेही तितकंच महत्त्वाचं असतं. वडिलांना भेट वस्तू, महागडे gifts देऊन किंवा एखाद्या restaurant मध्ये जाऊन celebrate करणे, enjoy करणे असा अनेकांचा plan असतो. किंबहुना आम्ही असेच साजरे करत असतो. वडिलांना आनंद होतो. तो आनंद त्यांच्या चेहर्यावर दिसतो. हा आनंद फक्त एका दिवसासाठी का बरं असतो तो वर्षभर टिकून राहावा यासाठी आमचा प्रयत्न का नसतो याचा विचार आम्ही कधी केला आहे का? आजच्या तारखेला हा विचार करतो का? विचारा प्रश्न स्वतःच्या मनाला !
एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे Joints family. एकत्र कुटुंब पद्धतीची जागा आज विभक्त कुटुंब पद्धतीने घेतली आहे. पाश्चिमात्य देशात मुलगा, मुलगी मोठी झाली त्यांना व्यवहारिक ज्ञान प्राप्त झाले, कमावते झाले की लग्न होऊन स्वतंत्र राहू लागतात. मग आठवड्यातुन किंवा महिन्यातून एकदा weekend ला भेट. त्या भेटीत भेटण्याची ओढ, प्रेमाचा ओलावा, नातेसंबंध याचा किती टक्के भाग असतो भेटण्यात. कारण आम्ही हृदयशून्य झालो आहेत. हृदयातून भेटतो का? मुले आपल्या dad ला फोन करून विचारतात Dad next weekend ला भेटूया किंवा dad स्वतः आपल्या मुलाला, मुलीला भेटायला येतात. वडिलांच्या प्रेमाची गिनती, मूल्य होऊच शकत नाही पण ते आजकालच्या sophisticated, well educated असलेल्या मुलांना कधी आणि कसे समजणार? ही वास्तव परिस्थिती आहे पाश्चिमात्य देशांची. आपल्याकडे फारसी चांगली परिस्थिती आहे असे ही म्हणता येणार नाही. आज कित्येक वृद्धाश्रमात आई वडील आपल्याला भेटायला मुले येतील या आशेने चातक पक्षासारखे डोळे लावून वाट पाहत बसले असतात. वृद्धाश्रमात गेल्यावर वृद्धाश्रमाची काय बिकट अवस्था आहे हे तिथे गेल्यावर कळते. लहान असताना नकळत प्रेम मिळत असते मोठे झाल्यावर तारुण्यात प्रेम कमवाव लागते आम्ही म्हातारपणी प्रेम मागायची वेळ येते. यावर अनेक चित्रपट, movies येऊन गेले आपण त्यातून काय शिकवण घेतो, काय पाहतो हे आपल्याच माहिती.
विषय आहे वडील आणि हा काय सांगत बसलाय पाश्चिमात्य देशाचं आणि कुटुंब पद्धतीच. कुटुंबातील कर्ता सदस्य हा पुरूष असतो. ज्यांना वडिलांच प्रेम लाभले त्यांच्या सानिध्यात राहिले ते धन्य. नाहीतर आज कित्येक मुले, मुली वडीलांच्या प्रेमापासून वंचित आहेत. शाळा सुटल्यावर बाबा घ्यायला येतील. अरे पप्पा आहेत ना तू कशाला टेंशन घेतोस. लहान मुले पप्पा घरी आल्यावर पहिली पप्पांची बॅग चेक करणार आज काय आणले आहे. काही आवडीचे असेल तर किती आनंद होतो. आपल्या पेक्षा वडिलांना. त्यांना माहित असते office सुटल्यावर आज काहीतरी घेऊन गेले पाहिजे मुले वाट बघत असणार किती काळजी असते. जेव्हा वडिल शरीराने समोर नसतात तेव्हा या सर्व आठवणी जाग्या होत्या अगदी टवटवीत फुलांसारख्या तरल होऊन डोळ्यासमोरून जातात. वडिल त्या नारळा सारखेच असतात. बाहेरून कडक, शिस्तीचे पण तितकेच आतून मधुर असतात. त्यांच्या प्रेमात गोडवा असतो. त्यांना झालेल दुःख इतर कोणालाही न सांगता ते दुःख स्वतः पचवत असतात आणि आपल्याला याचा ठावठिकाणा, अंदाज ही नसतो. आपण त्यांना ओळखण्यात कमी पडतो ठीक आहे लहान असताना पण मोठे झाल्यावर म्हातारपणात त्यांना मुलाच्या प्रेमाची भूक असते. लहान असताना वडिलांकडून मुलाला खूप प्रेम मिळाले असते आणि तेच प्रेम वडिलांना मुलाकडून हवं असते. तिथे मुलगा कमी पडतो लग्न झाल्यावर स्वतंत्र राहून अथवा वृद्धाश्रमात पाठवून केवळ दुःख देत असतो. याला Father's day म्हणायचे का?? ही आहे आजची परिस्थिती.
वडीलांच्या संपत्तीवर हक्क गाजविणाऱ्या तरुणांनी वडीलांच्या संपत्तीवर नव्हे तर त्यांनी केलेल्या संस्कारावर, त्यांनी दाखविलल्या योग्य मार्गावर चालणे त्यांच नाव मोठं करणे हे मुलाचे प्रथम कर्तव्य आहे तेव्हा वडिलांच्या चेहर्यावर खरं हसू पाहायला मिळेल. खरा आनंद पाहायला मिळेल. मुलाने आपल्या पावलावर पाऊल ठेवून चालत असल्याचे पाहून त्यांना अभिमान वाटेल जीवन धन्य सार्थक झाल्याचे वाटेल.
आयुष्य तर जगत आहे पण तुम्ही सोबत नसल्याचे दुःख होतेय तुम्ही गेल्यावर तो आनंद मात्र राहिला नाही. तुमचे आशिर्वाद, संस्कार, विचार आणि तुम्ही केलेले अथांग प्रेम कायम सोबत असणार आहे.
Love is not getting but giving result of the pure living.
- महेश
All rights Reserved, 2022@Mahesh Bhuwad